Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ७ मे, २०२०

ऑनलाईन व्हायरल भाषण स्पर्धा उत्स्फूर्त प्रितिसादात संपन्न



उस्मानाबाद दि.7(राहूल शिंदे) राज्यभरातुन २५ जिल्हातील स्पर्धकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
आपली नाती आपली माणसं ग्रुप आयोजित,कोरोनाच्या संचारबंदी मुळे शाळा तर बंद आहेत म्हणून घरीच बसून विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळण्यासाठी आणि ज्ञानात भर पडण्यासाठी राज्यस्तरीय ONLINE व्हायरल भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.ही स्पर्धा 6 ते 14 वयोगटातील मुला मुलींसाठी होती.तीन ते पाच मिनिट भाषणाचा व्हिडिओ मोबाईल व्हाट्सअप क्रमांकावर पाठवायचा होता या स्पर्धेत मराठी हिंदी इंग्रजी या तिन्ही भाषेतून भाषणे आली होती 

सदरील व्हिडिओ आम्ही बालव्याख्याती आरोही सोन्ने पाटील या फेसबुक पेजवर अपलोड केले,मिळालेल्या लाईक 50%आणि परीक्षक 50% यामधून दर्जेदार भाषण बक्षीसास पात्र ठरविले

तर यामध्ये प्रथम क्रमांक भुयार अथर्व मनोज आर्वी जि.वर्धा विषय कोरोना संकटातून काय शिकल? द्वितीय क्रमांक कदम स्नेहल सुभाष कदम सोनपेठ जि.परभणी विषय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तृतीय क्रमांक कुणाल राजू मस्के निपाणी जि.औरंगाबाद विषय छत्रपती शिवाजी महाराज यांनी उत्कृष्टरित्या भाषणे करून क्रमांक मिळविले याचबरोबर दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली यामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक गायत्री दयानंद चाटे मिरज जि.सांगली विषय आजची स्त्री कदम अर्णव मंगेश आर्वी वर्धा  यांनी उत्कृष्टरित्या भाषणे करून मिळविले.
प्रथम 2100 रू द्वितीय 1100 रू तृतीय 700 रू तर दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी 500रू ठेवण्यात आले होते याच बरोबर या स्पर्धेत महाराष्ट्रामधून जवळ जवळ १२० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता सर्वांनीच खूप छान प्रकारे भाषणे केली ही स्पर्धा 
विनोद कळेकर सर आणि किशोर गायकवाड सर यांनी आयोजित केली होती या स्पर्धेसाठी प्रशांत सुरवसे सर , प्रभुकांत सोन्ने सर आणि दीपक घाटे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच गणेश सरवदे सरांचे विशेष सहकार्य  लाभले ही स्पर्धा व्यवस्थित व सुरळीत परत पाडण्यासाठी सर्वांनी मदत केली सर्व विजेत्या व सहभागी स्पर्धकांचे पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन स्पर्धेला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व स्पर्धकांचे पालकांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले श्रेष्ठ वक्ता बनण्यासाठी वक्त्याजवळ काही विशेष गुणवत्ता असावी लागते. 

या गुणांपैकी काही गुणांची वक्त्याला निसर्गतः देणगी मिळालेली असते. तर काही गुण त्याला प्रयत्न करुन प्राप्त करावे लागतात, विकसित करावे लागतात. ते गुण म्हणजे वाचन ,लेखन,चिंतन,
मनन,अभिनय,आवाज, शब्दोच्चार,भाषणाची गती,विषय ज्ञान,व्यासंग,निर्भयता,
आत्मविश्वास,विनोदबुद्धी, हावभाव,भाषाशैली,अभिनय,
शब्दशक्ती, स्मरणशक्ती,अवधान शक्ती,अशा रीतीने प्रत्येक वक्त्याने आपापल्या कुवतीप्रमाणे वक्त्यासाठी आवश्यक गुण आत्मसात करून आपले भाषण अधिकाधिक रंजक आणि परिणामकारक कसे करता येईल याचा विचार करावा. 'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे', हे ध्यानात ठेऊन प्रत्यक्ष कृती करण्याचा प्रयत्न करावा. भाषण हि कला असून ती कष्टसाध्य आहे.

हे ध्यानात घेऊन या क्षेत्रात ज्याला नाव कमवायचे आहे अशा वक्त्याने हि कला आत्मसात करण्यासाठी या सर्वांचा सूक्ष्म अभ्यास करून हि कला आत्मसात करावी.असे प्रभुकांत सोन्ने सर म्हणाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध