Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ७ मे, २०२०
Home
/
Unlabelled
/
दहिवदमध्ये प्रभारी पोलीस पाटील प्रविण गोसावी यांची अवैध दारू विरोधात मोठी कारवाई
दहिवदमध्ये प्रभारी पोलीस पाटील प्रविण गोसावी यांची अवैध दारू विरोधात मोठी कारवाई
पंकज
पाटील :तरुण गर्जना - अमळनेर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रोगांचा संसर्ग पसरत आहे .तालुक्यासाठी हि
चिंतेची बाब असून परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. त्यात शासनाने तिजोरीत महसूल
जमा व्हावा म्हणून दारूची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला.
शहरात व ग्रामीण भागात
पोलिसांची जबाबदारी वाढत चालली आहे. ग्रामीण भागात कोरोनाला रोखण्यासाठी अमळनेरचे
गटविकास अधिकारी संदीप वायाळ एकाकी झुंज देत आहेत.त्यात ते प्रशासनाच्या दोन्ही
भूमिकेत काम करत आहेत. आज त्यांच्या निरदर्शनाखाली अवैध्य दारू विरोधात मोठी
कारवाई दहिवद गांवी करण्यात आली.
दारूच्या दुकानासमोर होणारी गर्दी व शहरात पसरणारा महामारीचा रोग यामुळे
काही फक्त शिक्षणाने
सुशिक्षित झालेले लोक खेड्यांकडे अवैध्य (हातभटीची दारू ) पिण्यासाठी येत
आहेत. खेड्यात रोज पिणारे त्यात अमळनेर शहरातील चोर मार्गाने येणाऱ्या मद्यपी मुळे दहिवद गावांत संध्याकाळी बेवड्यांची
जत्रा भरत होती.
गावांतील होणाऱ्या गर्दी मुळे कोरोना
रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता वाटत चालली होती. राज्य उत्पादन शुल्क
कुंभकर्णा सारखे झोपलेले असल्याने न्याय मागावा तरी कुणाकडे ? अशी अवस्था
निर्माण झाली होती .
दहिवदचे प्रभारी पोलीस पाटील प्रविण गोसावी
यांनी पुढे येत ग्रामविकास अधिकारी संजीव सैंदाणे ,ग्रामपंचायत
सदस्य शिवाजी पारधी व देवानंद बहारे यांना
सोबत घेत एकाच दिवसांत तब्बल बारा अवैध्य दारूच्या
भट्ट्या उध्वस्त केल्यात.
प्रविण गोसावी यांनी केलेल्या ह्या कारवाई मुळे सद्यातरी दारू बंदी वर आळा
घालण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला गेला असून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पायबंद करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील अवैध मद्य निर्मिती व विक्री यावर नियंत्रण राखण्यासाठी
स्थानिक पातळीवर नागरिकांची मदत घेवून प्रयत्न करणार असल्याचे दहिवदचे प्रभारी
पोलीस पाटील यांनी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा