Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ६ मे, २०२०

नोकरीभरती रद्द न करता किमान वेतन देऊन भरती करावी-आ.रोहित पवार



जामखेड दि.6(प्रतिनिधी) कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे आपल्या महाराष्ट्र  राज्य सरकारची आर्थिक स्थिती ही अत्यंत बिकट झाली असल्या मूळे राज्यसरकारने वर्ष भर नोकरभरती न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे काल अर्थमंत्री आ.अजित पवार यांनी सांगितले. ह्यावर त्यांचाच पुतण्या कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आ. रोहित पवार यांनी त्यांचं मत मांडलं आहे.

कोरोना मूळे वित्तीय संकट आलं असल्या मूळे सरकारने नोकर भरती रद्द केली आहे. पण वयाच्या अटी मूळे अनेक युवा एग्जबार होतील त्यामुळे सरकारने भर्ती रद्द न करता वर्ष भरासाठी मोफत सेवा अथवा किमान वेतन द्यावे त्यामुळे तरुणांना नोकरी व सरकारला मोठया प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध होईलआणि याला युवा सहकार्य करतील असा विश्वास ही रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध