Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २७ मे, २०२६

वणी नगरीत भक्तीचा महापूर; प.पू. गौतममुनीजी म.सा. यांच्या २९ व्या दीक्षा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद.



मुकेश लोढा :-
वणी नगरीत सध्या भक्ती, अध्यात्म आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून महाराष्ट्र गौरव, खान्देश केसरी तथा “वणी के जादूगार” म्हणून ओळखले जाणारे परमपूज्य गौतममुनीजी म.सा. (बरसा दाता) आणि युवा मनीषी परमपूज्य चेतनमुनीजी म.सा. यांचे भव्य शुभागमन मोठ्या जल्लोषात पार पडले.यावेळी प.पू. गौतममुनीजी महाराज साहेब यांच्या संयम, त्याग आणि साधनेच्या २९ व्या दीक्षा महोत्सवानिमित्त सकल वणी जैन समाजाच्या वतीने त्यांना “ज्ञानपुंज” ही सर्वोच्च मानाची पदवी प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच आपल्या प्रभावी आणि ओघवत्या प्रवचनातून समाजप्रबोधन करणारे युवा मनीषी प.पू. चेतनमुनीजी महाराज साहेब यांना “प्रवचन सूर्य” या मानाच्या पदवीने सन्मानित करण्यात आले.या दोन्ही संतांच्या गौरवामुळे संपूर्ण वणी परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.या भव्य धार्मिक सोहळ्याचे संपूर्ण व्यवस्थापन आणि नियोजन “महावीर ग्रुप, वणी” यांच्या वतीने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. महावीर ग्रुपचे अध्यक्ष कैलास चोपडा यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे नियोजन देखणे आणि आकर्षक झाले.या ऐतिहासिक सोहळ्यासाठी वणी व परिसरातील अनेक मान्यवर, समाजश्रेष्ठी आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जयंतीलालजी समदडिया , पारसमलजी सिसोदिया, दिलीप बोथरा, मनोज बोथरा, प्रवीणजी बोरा, बाळूशेठजी खाबिया, मयूर जैन, मुकेश सिसोदिया, हसमुख बोथरा, सुमित बोरा, रोहित बोरा, वैभव बोरा, महावीर खाबिया, महेंद्र बोरा, किशोर बोरा, अनिल समदडिया , मुळचंद बाफना, अभिजीत सिसोदिया, जितू बोरा, प्रशांत समदडिया,रमेश चोपडा यांच्यासह संदीप लुनावत, महेंद्र पारख, सचिन खाबिया, निलेश चोपडा, स्वप्निल, वृषभ, निशांत, समीर, विपुल, निखिल कटारिया आणि हितेश पारख यांची प्रमुख उपस्थिती होती.महाराजांचे शहरात आगमन होताच जैन बांधवांसह सर्वधर्मीय नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. ‘ज्ञानपुंज’ प.पू. गौतममुनीजी म.सा. यांच्या २९ वर्षांच्या कठोर संयम आणि साधनेबद्दल समाजाने कृतज्ञता व्यक्त केली. तसेच ‘प्रवचन सूर्य’ प.पू. चेतनमुनीजी म.सा. यांच्या अमृतवाणीचा लाभ घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.महावीर ग्रुपच्या सर्व सदस्यांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत या सोहळ्याचे उत्तम नियोजन केले असून या भव्य धार्मिक महोत्सवामुळे संपूर्ण वणी नगरी अध्यात्म आणि भक्तीरसात न्हाऊन निघाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध