Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ६ मे, २०२०

लॉकडाऊन मुळे व्यवसाय चालकांचे दुकान बंद असल्याने विज बिल, फोन /नेट बिल माफ होणे बाबत झेरॉक्स व्यवसाय युनियनतच्या वतिने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

   
                      
रावेर दि. ६ ( प्रतिनिधी ) कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव (कोविड-19)मुळे देशभरात लॉकडाऊन असले कारणाने  व्यवसाय चालकांचे दुकान बंद असल्या कारणाने ‍ विजबिल घेण्यात येऊ  नये,त्याचबरोबर  फोन /नेट बिल व नं.पा रावेर अंतर्गत भाडयाने दिलेले, दुकान किंवा संस्थेने दिलेले दुकानाचे भाडे लॉकडाऊन काळात माफ होणे बाबतचे निवेदन रावेर तालुका झेरेक्स व्यवसाय युनियनच्या वतीने निवासी नायब तहसिलदार संजय तायडे यांना देण्यात आले.
      
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, उपरोक्त संदर्भीय विषया अन्वये ,विनंती व सहानुभूतीपुर्वक निवेदन सादर करित आहे. कोरोना व्हायरस (कोविड-19) मुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे संपुर्ण व्यवसाय धारकाचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. पण.. अश्या संकटसमयी खालील बाबीचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा. कारण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण लि.कं.लॉकडाऊन काळात दुकाने बंद असल्याने विज बिल घेण्याचे  आयोजले असुन, कंपनीने या लॉकडाऊन काळाचे बिल घेण्यात येऊ नये.कारण विजेचा वापरच झाला नाही.त्यामुळे ऍव्हरेज बिल घेण्याचा प्रश्नच येत नही. जर घ्यायचेच असेल तर मिटर भाडे घ्यावे किंवा पुर्ण बिल माफ करावे.,सर्व व्यवसाय धारकाचे दुकाने बंद होते. त्यामुळे बि.एस.एन.एल.च्या फोनचा किंवा नेटचा वापरच झाला नाही. त्यामुळे बिल घेण्यास येऊ नये व लॉकडाऊन काळातले बिल माफ करावेत.,नुसार न.पा. रावेर अंतर्गत किंवा इतरत्र संस्थे अंतर्गत भाडयाने दिलेली गाळे भाडे  लॉकडाऊन काळात घेण्यात येऊ नये. व्यवसाय धारकाचे लॉकडाऊन काळात मोठया प्रमाणात नुकसान झालेले असुन या संकटसमयी वरील ‍तिन्ही मागण्याचा  सहानुभूती पुर्वक ‍विचार करावा. अशा मागण्याचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.                            
सदर निवेदनाच्या प्रति म. उप अभियंता सो. म.रा. वि.वि कं. मर्या., म. उप.विभागीय अभियंता सो. बि.एस.एनएल. रावेर यांना दिल्या आहे.
       
दिलेल्या निवेदनावर दिलीप  कांबळे अध्यक्ष रावेर तालुका झेरॉक्स व्यवसाय युनियन मुकेश जिरीमाळी सचिव रावेर ता.झे.व्य.यु ,राजेश कांगो कोषाध्यक्ष रावेर ता.झे.व्य.यु.
राजेंद्र अटकाळे प्रसिध्दी प्रमुख, एस.आर. शेख, एल.एस. पाटील, राहुल सुर्यवंशी, योगेश महाजन, विक्रम पाटील, अनिल पाटील, अर्जुन पाटील, घनश्याम जिरीमाळी, अशोक पाटील, संदिप येवतकरे, राहुल डी.गाढे यांच्या सहया आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध