Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १ मे, २०२०
बँक खातेदारांना होतोय ग्राहक सेवा केंद्राचा मोठा फायदा
परंडा प्रतिनिधी दि.30 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे.
महाराष्ट्रराज्यात तर ही परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे.राज्यात आज रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९९१५ येवढी झाली आहे.
त्यातच अत्यावश्यक सेवा बँकींगसाठी नागरिकांना बाहेर पडावे लागत आहे.बँका व ग्राहक सेवा केंद्रे आपले कार्य समाधानकारक पार पाडत आहेत.जन-धन खात्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून महिलांच्या खात्यात प्रत्येकी ५०० रुपये जमा झाले. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीची रक्कम जमा झाली आहे. बँकेत व एस.बी.आय ग्राहक सेवा केंद्रातून पैसे काढण्यासाठी ग्रामीण भागातील महिलां,पुरुष येत आहेत. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी ‘सोशल डिस्टन्सिंगकडे विशेष लक्ष दिल्याने ग्राहकांना खात्यावरील पैसे काढण्यासाठी दिलासा मिळत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दुर्ष्टीने सिनेटायझर, मास्कचा वापर करून व स्वच्छता राखून सामाजिक अंतर ठेऊन व्यवहार केले जात आहेत. आजच्या या कोरोनाच्या संकटकाळात ग्राहक सेवा केंद्र संचालक नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेत आपली सेवा चांगल्या प्रकारे व जेष्ठनागरिकांना आदरपूर्वक देताना दिसत आहेत.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांच्या उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली. त्यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून महिलांना तीन महिने पाचशे रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
सध्या महिला बँक व सेवा देणाऱ्या ग्राहक सेवा केंद्रावर रक्कम काढण्यासाठी येत आहेत. ग्रामीण भागातील महिलांना लॉक डाऊन मुळे वाहने नसल्याने सकाळीच घरातून निघावे लागते. महिलाना पायी चालत यावे लागते. गावातील तसेच तालुक्यातील बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालू असल्याने नागरिकांना विना विलंब पैसे मिळत आहेत.
यामुळे ग्राहक सेवा केंद्राचा बँक खातेदारांना निश्चितच फायदा होत आहे. ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंग सामाजिक अंतर व सुरक्षितता पाळूनच या ठिकाणी व्यवहार केले जात आहेत. नागरीकामधून समाधान व्यक्त केले जात आहे. सुरळीत व्यवहार होत आहेत.अशी माहिती चिंचपूर (बु) येथील ग्राहक सेवा केंद्र चालक श्री.दत्तात्रय भोगील यांनी दिली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा