Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३० जून, २०२०
Home
/
Unlabelled
/
औरंगाबाद येथील दैनिक दिव्य मराठीच्या आवृत्तीचे संपादक, प्रकाशक व वार्ताहर यांच्याविरोधात प्रशासनाने गुन्हा दाखल..!
औरंगाबाद येथील दैनिक दिव्य मराठीच्या आवृत्तीचे संपादक, प्रकाशक व वार्ताहर यांच्याविरोधात प्रशासनाने गुन्हा दाखल..!
शिरपूर प्रतिनिधी औरंगाबाद येथील दैनिक दिव्य मराठीच्या आवृत्तीचे संपादक, प्रकाशक व वार्ताहर यांच्याविरोधात प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे.
याविरोधात मंगळवारी शिरपूर शहर व तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे,औरंगाबाद येथील दैनिक दिव्य मराठी आवृत्तीचे संपादक,प्रकाशक व वार्ताहर यांच्याविरोधात प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. कोरोना काळात प्रशासनातील त्रुटी दाखवून सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी केल्याने माध्यमांना दाबण्याचा हा प्रयत्न होत आहे.
त्यामुळे औरंगाबाद येथील सायबर सेलने दैनिक दिव्य मराठीच्या संपादक, प्रकाशक व वार्ताहर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. यातून जणू ही लोकशाही आहे की आणीबाणीचा काळ आहे ? असा प्रश्न आता पत्रकारांसह सर्व सामान्यांना पडला आहे. सत्यता चव्हाट्यावर आणल्याने गुन्हे दाखल करून माध्यमांची गळचेपी करण्यात येत आहे.
याचा शिरपूर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने दिव्य मराठीच्या विरोधातील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी ही पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी पत्रकार संघाचे ईश्वर बोरसे,बोरसे किशोर माळी, संतोष भोई,युवराज राजपूत, संजय पाटील, महेंद्र जाधव, राहुल पाटील, भिका चव्हाण, राजेंद्र पाटील,जयंत सरदार,प्रशांत चौधरी आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा