Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२६
Home
/
/
सुरगाण्यात बोगस डॉक्टरवर आरोग्य विभाग व पोलिसांची मोठी कारवाई; औषधसाठ्यासह साहित्याचा पर्दाफाश!.
सुरगाण्यात बोगस डॉक्टरवर आरोग्य विभाग व पोलिसांची मोठी कारवाई; औषधसाठ्यासह साहित्याचा पर्दाफाश!.
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :-
तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम राबवली आहे. सुरगाणा गावातील तेल्ली गल्ली येथे कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा ॲलोपॅथी उपचाराचा अधिकृत परवाना नसताना सर्रास प्रॅक्टिस करणाऱ्या पश्चिम बंगालच्या एका बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडील हजारो रुपयांचा औषधसाठा व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले आहे.
नेमकी काय आहे घटना ?
सुरगाणा गावातील तेल्ली गल्ली येथे सचिन संतोष बाला (वय ४४ वर्षे, मूळ रा. आकमपूर हावडा, जि. २४ परगणा, पश्चिम बंगाल; सध्या रा. तेल्ली गल्ली, सुरगाणा) हा इसम शासनाचा कोणताही वैद्यकीय परवाना नसताना बेकायदेशीरपणे ॲलोपॅथी उपचार करत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती.
दि. २८/०८/२०२६ रोजी दुपारी ३.५० वाजेच्या सुमारास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप संभाजी रणविर यांच्या पथकाने सुरगाणा पोलिसांच्या मदतीने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईदरम्यान आरोपी सचिन बाला हा कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय रुग्णांवर उपचार करताना व औषधसाठा बाळगताना रंगेहात मिळून आला.
हजारो रुपयांचा औषधसाठा व उपकरणे जप्त
छाप्यादरम्यान पोलिसांनी संशयिताकडून स्टेथॉस्कोप, आयव्ही सेट्स (IV Sets), सलाईनच्या बाटल्या (DNS, Normal Saline), विविध प्रकारची प्रतिजैविके (Antibiotics), ॲसिडिटी, ताप, वेदनाशामक गोळ्या, सिरप, इंजेक्शन्स, निडल्स आणि प्रेग्नन्सी टेस्ट किट्स असा एकूण ९,७६९ रुपयांचा अवैध औषधसाठा व साहित्य जप्त केले आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमान्वये गुन्हा दाखल
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणविर यांच्या फिर्यादीवरून सुरगाणा पोलीस ठाण्यात आरोपी सचिन संतोष बाला याच्याविरोधात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३, ३४ व ३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याची नोंद सपोउपनि शंकर आर. भोये यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज जे. कुवर करत आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा बोगस डॉक्टरांवर यापुढेही कडक कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
दिंडोरी प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील प्रा.उपकेंद्रात जन आरोग्य समितीची बैठक नुकतीच पार पडली. पार पड...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा