Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३० जुलै, २०२०
एस.एस.सी बोर्ड परीक्षा मार्च 2020 ऑनलाईन निकाल जाहीर..!
केसकर महेश,केसकर हरिदास ,देवरे प्रीति , भोगील करण,अनभुले दीक्षा,सुरवसे विजय, मुसळे अंजली ,
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.30 महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल काल जाहीर झाला आहे. यंदा हा निकाल 95.30 %लागला असून, यावर्षीदेखील बोर्डाच्या निकालामध्ये मुलींचं वर्चस्व पहायला मिळत आहे. तर 9 विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे.
20 विषयांचा निकाल 100% लागला आहे. मार्च 2019 च्या तुलनेत यंदा 18.20 % निकाल अधिक लागला आहे.
गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत – 30 जुलै 2020 ते 8 ऑगस्ट 2020
छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत – 30 जुलै 2020 ते 18 ऑगस्ट 2020
विभागनिहाय बोर्डाचा संपूर्ण निकाल:
कोकण – 98.77 टक्के
पुणे –97.34 टक्के
कोल्हापूर – 97.64 टक्के
मुंबई – 96.72 टक्के
अमरावती –95.14 टक्के
नागपूर – 93.84 टक्के
नाशिक – 93.73 टक्के
लातूर – 93.09 टक्के
औरंगाबाद –92 टक्के
महाराष्ट्रात 9 विभागीय मंडळांमध्ये 10 वीची परीक्षा होते. त्यानुसार यंदा दहावीच्या परीक्षेला 17 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी बसले होते. दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली, तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान 8 हजार 360 शाळांचा निकाल 100 टक्के लागला.विशेष म्हणजे राज्यातील 242 मुलांना 100% गुण मिळाले आहेत.
एस.एस.सी बोर्ड परीक्षा मार्च-2020 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छूक:- तरुण गर्जना न्युज पेपर टीम
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ...













कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा