Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १४ जुलै, २०२०

शिरपूर तालुक्यात उपरपिंड या ठिकाणी चालत आहे वाळु माफीयाचा मुजोरपणा..!



नायबतहसिलदार,तलाठी मंडल अधिकारी यांच्या वर हल्ले होऊन सुध्दा वाळू माफिया याचे चालु आहे साटेलोटे..!


शिरपूर प्रतिनिधी: राज्यपटलावरील अनेक वृत्तपत्रात आपण विविध ठिकाणी वाळू माफिया आपल्या मनमानी कारभाराचे कारस्थान करतांना दिसत आहेत.

कोव्हीड-१९च्या काळात सरकारी यंत्रणा आपल्या कामात सातत्याने गर्क असतांना दिसत आहे. त्यातच वाळुमाफीयांचे चांगलेच फावत असल्याचे तालुक्यातील काही घटनेवरून दिसत आहे.शिरपूर तालुक्यात नायबतहसीलदार, तलाठी, तसेच मंडल अधिकारी यांच्यावर हल्ले हे भुतकाळात ही झालेले आहेत परंतु वेळीच उपाययोजना करुन त्यावर उपाय केले आहेत परंतु आताही वाळू माफिया डोकेवर काढल्याचे ते नित्याने दिसत आहे असे काही ठिकाणच्या प्रसंगावरून दिसत आहे. 

गौण खनिजांची अवैध वाहतूक करणे उपरपिड गावातील ग्रँमपचायती जागे वरती वाळूचा साठा करणे, साठा करुन ते विना परवाना वितरित करणे हे जरी कायद्याने गुन्हा असला तरी हा कायदाच काहींनी आपल्या हिंमतीवर धाब्यावर ठेवल्याचे दिसत आहे. 

तरी अशा समाज विरोधी शक्तींचा सरकारने त्वरीत बंदोबस्त करुन त्यावर जास्तीची उपाययोजना सरकारने करावी अशी शिरपूर तालुक्यातील मांगणी समाजस्तरावरुन होतांना दिसत आहे.

सविस्तर वाचा पुढील अंकात कोन आहेत हे वाळू माफिया..? 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध