Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १४ जुलै, २०२०

धुळे जिल्ह्यातील आणखी ५२ रुग्णांचे अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह



५२अहवाल पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

उंटावद:धुळे जिल्ह्यातील आणखी ५२ रुग्णांचे अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले. तर धुळ्यातील मोहाडी उपनगरातील ६५ वर्षीय पॉझिटिव्ह महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाला.

धुळे शहरातील मोहाडी उपनगरातील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा हिरे महाविद्यालयात मंगळवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
मंगळवारी प्राप्त अहवालांनुसार, धुळे शहरातील ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यात राऊळवाडी गणपती मंदिर, जुने धुळ्यातील १४ वी गल्ली, वरखेडी रोड, मुक्ताईनगर,पाटकर नगर, वाडीभोकर रोड येथील रुग्णांचा समावेश आहे.

शिरपूर शहरातील तालुक्यातील ९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यात शिरपूर येथील पाटीलवाडा एक, वाडी गावातील तीन, भोरखेडा व मांडळ येथील प्रत्येकी दोन आणि वाघाडी येथील एक रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १६७५ इतकी झाली आहे. आतापर्यंत ७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ९४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध