Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २० जुलै, २०२०
रा.प.चालक प्रशिक्षण घेणारे उमेदवारांची स्थगितीला वंचित बहुजन आघाडी चा विरोध..!
धुळे प्रतिनिधी सचिन वाफेकर
रा.प. महामंडळाने परिपत्रक क्र.२०३५ दि.१७ जुलै २०२० रोजी रोजंदार गट क्र.१ मध्ये नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची, अनुकंपा तत्वावर उमेदवार प्रशिक्षण घेत असल्यास सदर उमेदवारांचे प्रशिक्षण देखील सेवा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात यावी असा कामगार विरोधी निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाला वंचित बहुजन आघाडी तिव्र विरोध आहे कारण जे कर्मचारी याला बळी पडणार आहेत त्या कर्मचाऱ्यांची भरती राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील तरुण-तरुणींना रोजगार मिळावा या उद्देशाने विशेष ४ हजार २४२ पदांची भरती करण्यात आली होती.
तसेच संपुर्ण जग कोरोना व्हायरस कोवीड१९ च्या प्रादुर्भावामुळे अत्यंत अडचणींचा सामना करीत असतनाच याबाबतच्या गंभिर समस्यांना भारताला देखील सामोरे जावे लागत आहे.
त्याविरुद्धच्या एकत्रित प्रयत्नांचा भाग म्हणून महाराष्ट्र शासन उद्योग, उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र.२०२०/प्र.क्र.४५/काम-९ दि. ३१ मार्च २०२० या संदर्भात आदेशान्वये स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणत्याही आस्थापनांवर काम करणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांना मदत करणे बाबत विशेषतः कंत्राटी काम करणाऱ्यांचे वेतन कमी करू नये अशा सूचना दिल्या आहेत. तसेच जर काही कारणांनी कामावर येता आले नाही तर ते कामावर नसलेला कालावधी देखील त्यांचा पगारी रजेचा कालावधी म्हणून गृहीत धरावा असे सांगितले आहे.
तसेच *रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना कामावरून कमी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच राज्यशासनाच्या कोणत्याही खात्यात अशा प्रकारे कामगार कपात करण्यात आलेली नाही
असे असतांना रा.प.महामंडळाने घेतलेला निर्णय अतिशय दुर्दैवी आहे. *देशाचे मा पंतप्रधान महाराष्ट्राचे मा मुख्यमंत्री यांनी या संकटात कोणालाही नोकरीवरून काढणार नाही कोणीही वेतनापासून वंचीत रहाणार नाही असे जाहीर केले असताना एस टी कामगारांविषयी असा निर्णय घेणे दुर्दैवी आहे या निर्णयाने अनेक संसार उध्वस्त होण्याची भिती असल्याने हा निर्णय तातडीने रद्द करावा अन्यथा राज्यभरातील चालक प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार आठ दिवसांत लाँग मार्च काढणार आहेत लवकरात लवकर शासनाने हा निर्णय त्वरित रद्द करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी ,धुळे व प्रशिक्षण घेणारे उमेदवारांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कडकं
उत्तर द्याहटवा