Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २२ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
टाकरखेडा परिसरात मोठा वाळू साठा तक्रार..! टाकरखेडा येथील रहिवासी याची कारवाई करण्याची मागणी..!
टाकरखेडा परिसरात मोठा वाळू साठा तक्रार..! टाकरखेडा येथील रहिवासी याची कारवाई करण्याची मागणी..!
प्रतिनिधी सतिष पवार सारवे
दोंडाईचा प्रतिनिधी:शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथे तापी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करुन त्याचा साठा नदी पात्रात करण्यात आला आहे़ अवैध वाळू उपशाविषयी कारवाई करावी, अशी मागणी टाकरखेडा येथील रहिवासी अनिता नरेंद्र गिरासे यांनी केली आहे़.
यासंदर्भात गिरासे यांनी दोंडाईचा अपर तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टाकरखेडा परिसरात असलेल्या अवैध वाळू उपसा आणि साठ्याबाबत २ जुलै रोजी देखील तक्रार दिली होती़ सुलवाडे, जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेसाठी वाळू देण्याची मुदत तीन महिन्यांपूर्वीच संपली आहे़.
तरी देखील साठा कायम आहे़ अशा प्रकारे बेकायदेशिर वाळूसाठा करुन त्यानंतर डंपर अथवा तत्सम वाहनाच्या सहाय्याने सदर साठा चोरुन विकला जात आहे़ असे असताना महसूल प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही, असा आरोप करण्यात आला आहे़ शहादा तहसिलदारांनी गेल्या महिन्यात सारंगखेडा परिसरात मोठी कारवाई करीत अनेक वाहने पकडून दंड ठोठावला होता़.
आपणाकडूनही अशी कारवाई अपेक्षीत होती़ परंतु तसे झाले नाही़ टाकरखेडा परिसरात असलेला साठा जप्त करुन त्याचा शासकीय पध्दतीने लिलाव करावा, अशी मागणी केली आहे़ अन्यथा कायदेशिर मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा दिला आहे़.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा