Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २२ जुलै, २०२०
थाळनेरला रस्ता काँक्रीट कामांचा शुभारंभ..!
थाळनेर (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे जिल्हा परिषद वार्षिक योजनेतून १५ लाख रुपये खर्चाच्या कॉंक्रीट रस्ता कामाचा शुभारंभ धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार भाऊ रंधे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून थाळनेर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सौ.भैरवी प्रेमचंद शिरसाठ, थाळनेर गणाचे पंचायत समिती सदस्य विजय बागुल, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र सिंग जमादार, माजी पीक संरक्षण सोसायटी चेअरमन एकनाथ जमादार, भोजुसिंग जमादार आधी उपस्थित होते.
मान्यवरांचा सत्कार सरपंच प्रशांत पाटील, उपसरपंच सौ. आशाबाई वामन कोळी व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्ता काँक्रेट कामासाठी जिल्हा परिषदेच्या वार्षिक योजनेतून १५ लाख रुपये देण्यात आले आहेत. सदर रस्त्याचे काँक्रीट काम हितेंद्र जमादार यांच्या घरापासून ते प्रदीप मराठे यांच्या घरापर्यंत करण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी जिल्हा परिषदेतून थाळनेर गावासाठी तीर्थक्षेत्र विकास निधी, जनसुविधा योजनेतून, नागरी सुविधा योजनेतून गावातील विविध कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्याबद्दल ग्रामस्थांचा तर्फे सरपंच यांनी आभार व्यक्त केले.
धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे यांनी तापी नदीकाठी जाऊन अमरधाम जागेची पाहणी केली व सर्व सुविधायुक्त अमरधाम उभारण्याची सूचना अधिकार्यांना दिली. तसेच तीर्थक्षेत्र विकास निधी कुठे खर्च करण्यात येणार आहे त्या जागेची ही पाहणी केली.
यावेळी शिरपूरचे नगरसेवक रोहित रंधे, दिपक जमादार, ग्रामपंचायत सदस्य रुपेश निकम , नवनीत वाडीले, जुबेर मन्यार, श्याम भील, भटू शिरसाठ, अनिल मराठे, रमेश मराठे, सर्जेराव पाटील, शांताराम कोळी, भरत मराठे, डोंगर कोळी, उज्वल निकम, दिलीप कोळी ,गोपाल जमादार,वामन कोळी, रमेश शिरसाठ, जितेंद्र माळी, कैलास माळी, ग्राम विकास अधिकारी वेताळे, ठेकेदार हितेंद जमादार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शाम ठाकरे यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा