Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ११ जुलै, २०२०
कोरोनाच्या साथीच्या प्रादुर्भावामुळे धुळे महानगरपालिका मार्फत..!
कोरोनाच्या साथीच्या प्रादुर्भावामुळे धुळे महानगरपालिका मार्फत शास्तीमध्ये दिनांक १३ जुलै ते ३१ जुलै पावतो १००टक्के, तसेच १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पावेतो ७५ टक्के, व १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यत ५० टक्के व १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोंवर पावेतो २५ टक्के सवलत देण्यांचा निर्णय..!
-धुळे प्रतिनिधी सचिन वाफेकर-
धुळे: कोरोना विपत्ति च्या पार्श्वभूमीवर शहराची व नागरिकांची झालेली आर्थिक स्थिती लक्षात घेता नागरिकांवर कोणत्याही अतिरिक्त कराचा दंडाचा बोजा पडू नये यासाठी थकीत मालमत्ता करा वरील शास्ती मध्ये सूट द्यावी यासाठी स्थायी समिती सभापती श्री सुनील बैसाणे यांनी मनपा आयुक्तांना निवेदन सादर केले होते त्यानुसार मनपा प्रशासनाने या निवेदनाचा विचार करून नुकताच शास्ती माफीचा निर्णय घेतलेला आहे यामुळे धुळेकर नागरिकांना दिलासा मिळाला असून मनपा प्रशासनाचे अभिनंदन स्थायी समिती सभापती श्री सुनील बैसाने यांनी केले आहे
धुळे महानगरपालिका मार्फत अधिनियमातील तरतुदीनुसार थकीत मालमत्ता करावर दरमहा दोन टक्के शास्ती आकारण्यात येते. तसेच एप्रिल मे व जूनमध्ये आगाऊ मालमत्ता कर भरल्यास दहा टक्के ते सहा टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात व राज्यात तीन महिने संपूर्ण लॉक डाऊन परिस्थिती होती त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्थिती अत्यंत हवालदिल झालेली होती
अशा परिस्थितीत नागरिकांना आर्थिक स्थिती व लॉक डाऊन च्या परिस्थितीमुळे मालमत्ता कर भरणे शक्य झाले नाही या सर्व बाबींचा विचार करून मनपा मार्फत थकीत मालमत्ता करावर आकारण्यात येणारी शास्ती माफ करावी यासाठी सभापती सुनील बैसाणे यांनी समक्ष आयुक्त श्री अजीज शेख यांना निवेदन देऊन चर्चा करून मागणी केली होती सदर चे प्रसंगी त्यांनी याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते व त्यानुसार आज मनपा प्रशासनाने थकीत मालमत्ता करा वरील शास्ती मध्ये सवलत देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे
एकंदरीत या आपत्कालीन परिस्थितीत सदरचा निर्णय हा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा जनक असून सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी या झालेल्या अभिनंदनीय निर्णयाचे स्वागत सभापती श्री सुनील बैसाणे यांनी केलेले आहे. तसेच नाहक बसणारा दंडाचा बोजा टाळण्यासाठी या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हानही त्यांनी केलेले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा