Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ११ जुलै, २०२०
शेगावात तीन दिवस जनता कर्फ्यु..!
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे..! सर्व पक्षीयांचा निर्णय..!
-शेगाव प्रतिनिधी उमेश राजगुरे-
शेगाव शहरात कोरोनाचा धोका वाढत असून दररोज नवनवीन रुग्णआढळून येत आहेत. ही अतिशय चिंतेची बाब असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी तीन दिवस जनता कर्फ्यु पाळावा असे, आवाहन शेगावकरांनी केले आहे
इतर शहरांप्रमाणे शेगाव कोरोना हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील कोरोना रुग्ण संख्या खप मोठी झाली आहे. गत काही दिवसापासून शहरात दररोज कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे कोरोनाचा धोका अधीक वाढत आहे. वेळीच प्रतिबंध न केल्यास परिस्थिती हाता बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे अत्यावश्यक झाले आहे. तरी शहरातील सर्व व्यापारी, व्यवसायिक, तसेच नागरीकांनी सोमवार मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस स्वयंसपूर्तीने जनता कर्फ्यु पाळावा असे सर्व पक्षीयांनी केले आहे. या काळात नागरीकांनी स्वतःची व परिवाराची सुरक्षा लक्षात घेता घरातच राहवे .अत्यावश्यक काम नसल्यास घरा बाहेर पडू नये सर्वांनी जबाबदारी म्हणून हा जनता कर्फ्यु पाळल्यास आपण नक्कीच कोरोना हरवू शकतो असा विश्वास शेगावकरांना आहे.
( *या काळात फक्त अत्यावश्यक सेवाच काही विहित काळासाठी सुरु राहतील असे ठरविण्यात आले असल्याचे समजते* .)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा