Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ जुलै, २०२०
विजयसिंह पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश..!
परंडा (राहूल शिंदे)दि.16 तालुक्यातील चिंचपूर बु.येथील विजयसिंह पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सालाबाद प्रमाणे याही वर्षी गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत मोठे यश संपादित केले आहे.
फेब्रुवारी मार्च 2019-20 या शैक्षणिक वर्षांत इयत्ता बारावीच्या घेण्यात आलेल्या परीक्षा मध्ये शाळेचा 100% निकाल लागला आहे. यामध्ये परीक्षासाठी एकूण 39 विद्यार्थी बसलेले होते.
विद्यालयाचे प्रथम तीनआलेले विद्यार्थी खालील प्रमाणे
1)कु.उपासे मोक्षदा कालिदास 591 गुण 90.92%.
2)कु.कोळी अंकिता भगवान 572 गुण 88.00%.
3)कु.गायकवाड साक्षी महादेव 570 गुण 87.69% .
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक मा.श्री.रणजितसिंह पाटील, उपसरपंच श्री.युवराजसिंह पाटील,विद्यालयाचे प्राचार्य श्री.तुकाराम केसकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा