Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
गरीब मुलांना ऑनलाईन शिक्षण अडचणीचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन शिक्षण पध्दतीला सुरवात
गरीब मुलांना ऑनलाईन शिक्षण अडचणीचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन शिक्षण पध्दतीला सुरवात
गरीब मुलांना ऑनलाईन शिक्षण अडचणीचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन शिक्षण पध्दतीला सुरवात करण्यात आली आहे.
श्रीमंत , मध्यमवर्गीय यांपेक्षा गरीब मुलांना ऑनलाईन शिक्षण पारच अडचणीचे ठरत आहे.संगणक नाही,लॅपटॉप,मोबाईल नाही , गरीबांचे आई वडील स्वःताचा मोबाईल त्यांना देवून जात आहेत . त्या पालकांना त्यांचा मोबाईल संध्याकाळी मिळतो.
त्याच प्रमाणे वारंवारखंडित होणारा विद्युत पुरवठा नेटवर्क मिळत नाही , सातत्याने मोबाईल समोर बसल्याने आरोग्याच्या तवारी,डोळ्यांवर पडणारा ताण,हे सर्व त्या मुलांना त्रासदायक ठरत आहे.
त्यांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्याचा विचार होणे जरूरीची आहे . मुलांच्या वार्षिक परीक्षा कोणत्या पतीने ध्याव्यात,हा सुध्दा प्रश्न आहे.
शिक्षण तज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल . त्याच प्रमाणे एकच वार्षिक परिक्षा घेणे उत्तम जोपर्यंत कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही तोपर्यंत निदान ३-४ महिने परीक्षा पुढे ढकलणे जरूरीचे आहे .
वर्गात शिकवतांना विद्यार्थी,शिक्षक व पळा यांतजी एकात्मता , एकरुपता,आकलनवृत्ती असते तेवढी एकरुपता ऑनलाईन शिक्षणात असणार नाही . मुलांचे लक्ष , ध्यान दुसरीकडे भरकटण्याची शक्यता जास्त वाटते.काही शिक्षण संस्थांनी शिक्षणाचा व्यापार चालवला आहे .
तरीही कोरोनाच्या संकटात ,विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवण्यास ऑनलाईन शिक्षण हाच एक पर्याय होऊ शकतो . बदल हे घडतच असतात आणि त्या बदलांना आपलेसे करण्याशिवय गत्यंतर नसते . शेवटी जिवो जिवनस्म जिवनस्य ' हेच सत्य आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा