Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ जुलै, २०२०

कोरोनाच्या संकट काळात जनसेवा ही ईश्वर सेवाच म्हणून सेवाकार्य करणारे डॉ रोहिदास भोई समाजातील एक अवलियाच..!



नाशिक प्रतिनिधी:कोरोना महामारीच्या धाकाने लागलेल्या लॉकडाऊनमुळे गरिबांचे जगणे असह्य झाले आहे. काही ठिकाणी गरीब, मजूरांना एक वेळेचे जेवण सुद्धा मिळेनासे झाले आहे. 

अशातच अनेक समाजसेवक, समाजसेवा करणा-या अनेक सामाजिकसंस्था रस्त्यावर उतरल्याने अनेक गरजुंना दिलासा मिळाला आहे काहींनी घरी जाऊन, काहींनी रस्त्यावर तर काहींनी झोपडपट्टी भागात जाऊन किराणा किट, जेवण आणि अत्यावश्यक सेवेच्या वस्तूंचे वितरण केले आहे. 

नाशिक शहरातल्या वडाळागांव परिसर भागात असाच एक वैद्यकीय सेवेतील सेवक किंबहुना एक अवलियाच दिसला. डॉ. रोहिदास भोई नामक ह्या समाजसेवकाने आपल्या दवाखान्यात संपूर्ण कोरोनाच्या काळात निःशुल्कपणे रुग्नांची सेवा केली. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत डॉ श्री भोई यांनी दररोज १०० ते १५० रुग्नांवर इलाज करून त्यांना गोळ्या, औषधी हि उपलब्ध करून दिल्या. कोरोना काळात हि अनेक दवाखान्यामध्ये पैशांसाठी रुग्णांची साधी तपासणीही करण्यात आली नसल्याच्या अनेक घटना आपल्या समोर आल्या आहेत. 

अशातच डॉ. रोहिदास भोई हे करत असलेल्या सेवेची समाजाने आणि सरकारी यंत्रणेने आवर्जून दखल घ्यायलाच पाहिजे किंबहुना ती घ्यावीच..!आमचे नाशिक चे तरुण गर्जना न्युज पेपर प्रतिनिधी यानी डॉ भोई यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले कि, कोरोना काळात गरिबांची निःशुल्क सेवा केलीच पाहिजे. 

कारण आपण समाजाचे काही तरी देणे लागतो आणि ह्याच भावनेने मी वैद्यकीय क्षेत्रात कार्य केले तसेच ते इतरांनीही आपल्या परीने करावे म्हणजे समाजसेवेत प्रत्येकाने स्वतःला झोकून द्यायलाच पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध