Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ जुलै, २०२०
इच्छुक पोलीस पाटलांची ग्राम पंचायत प्रशासक पदी निवड करा.राजेंद्र भामद्रे..!
प्रतिनिधी उमेश राजगुरे:मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायती ची मुदत संपली आहे, तर काही ग्राम पंचायतीची मुदत लवकरच संपणार आहे.
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ग्राम पंचायत निवडणूका घेणे शक्य नसल्याने, शासनाने ग्राम पंचायतीवर योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून निवड करण्याचे ठरवले असुन, त्या बाबतीत प्रशासक निवडीचे सर्व अधिकार मा.पालकमंत्री महोदयांना देण्यात आले आहे.
त्यानूसार ग्राम स्तरावर अनेक दिग्गज आपली पुर्ण ताकद पणाला लावून गुडघ्याला बाशींग बांधून तयार झाले आहेत.
परंतु ह्या प्रशासक पदाच्या चढाओढीत,प्रचंड प्रमाणात घोडेबाजार होऊन,गावाची कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते..!
पोलीस पाटलांना ग्राम स्तरावर सर्वच प्रश्नाची चांगल्या प्रकारे जान आहे, त्यामूळे जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी प्रशासक पदासाठी पोलीस पाटील इच्छुक आहेत तेथे तेथे पोलीस पाटील यांना, प्रशासक पदी प्राधान्य देण्यात यावे.
जेणेकरून गावाची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होऊन, स्वच्छ व चारित्र्य संपन्न असलेले पोलीस पाटील गावाला योग्य प्रकारे न्याय देऊ शकतिल.
सोबतच शासनावर जो प्रशासकांना मानधनाचा अतिरिक्त बोजा पडनार आहे तो देखील कमी होईल.
ह्या बाबतीत लवकरच मा.पालकमंत्री महोदय बुलडाणा यांना भेटून निवेदन देणार असल्याचे बुलडाणा जिल्हा गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र भामद्रे पाटील यांनी न्यूज तरुण गर्जना शी बोलताना सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा