Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ११ जुलै, २०२०

भोईवाडा मोगलाई ,धुळे येथील जितेंद्र शिवा मोरे या भोई च्या मुलाचा निर्घुण खून..!



भोई समाज सेना तर्फे पोलिस स्टेशन ला धडक कारवाई ची मागणी!!

आज सकाळी कालिका देवी मंदिर रोड ला ट्रॅव्हल्स पाॅइंट जवळ जितेंद्र शिवा मोरे या भोई तरुणाचा मृतदेह आढळून आला. काल रात्री त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. 

भोई समाज सेना तर्फे ताबडतोब पाऊले उचलण्यात येऊन शहर पोलिस स्टेशन गाठण्यात आले. 

मृतदेह शव विच्छेदन साठी पाठवण्यात आला असुन आरोपी चा ताबडतोब शोध घेण्यात यावा आणि कारवाई करण्यात यावी अशी मागणी भोई समाज सेना संस्थापक भिलेशभाऊ खेडकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रोहितभाऊ शिंगाणे तथा भोई समाज सेना चे पदाधिकारी आणि भोई समाज बांधव यांनी केली.

यावेळी विजय वाडीले, ललीत मोरे, राहुल वाडीले, सुनील वाडीले, विशाल शिंगाणे, महेश मोरे, चुडामण वाडीले, नथ्थू चव्हाण, मयुर मोरे, मयुर वाडीले, प्रविण मोरे,‌ नंदलाल मोरे आदी असंख्य समाज बांधव हजर होते. तसेच भोई समाज महासंघ चे गणेशबापू मोरे, वसंत तावडे सर व अजून काही समाजबांधव यांनीही पोलिस स्टेशन गाठले आणि योग्य ती कारवाई तातडीने करण्याची मागणी करण्यात आली. 

मृत जितेंद्र शिवा मोरे हा एका कुरीयर कंपनीत काम करत होता व फारच गरीब आणि कष्टाळू होता. घरची हलाखीच्या परिस्थिती आणि म्हातारे आई वडीलांचा एकुलता एक मुलगा होता. 

त्याला एक लहान मुलगा आहे. भोई समाज सेना तर्फे एसपी आॅफिस आणि जिल्ह्याधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असून, आरोपी लवकरात लवकर शोधावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध