Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १२ जुलै, २०२०

भोई समाजाच्या तरुणास जिवे मारण्याची धमकी,धमकावणा-या गावगुंडांना तात्काळ अटक करण्याची मागणी..!


शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील भोईसमाजाचे समाजसेवक पूनमचंद मोरे यांना काल रात्री काही गावगुंडांनी फोनवर शिवीगाळ  करून जीवे मारण्याची धमकी दिली. 

पूनमचंद मोरे हे भोई समाज सेना या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चे जिल्हा उपाध्यक्ष तथा आरटीआय कार्यकर्ते आहेत.  त्यांचे समाजकार्य  काही राजकीय पुढारी यांना सहन होत नसल्याने त्यांना  धमकवण्यात  येत आहे.  याबाबत शिरपूर पोलिस स्टेशनला एफ आर आय दाखल करण्यात आली आहे. 

आत्ताच धुळे येथे एका भोई समाजाच्या तरुणास दगडाने ठेचून खून करण्याची आल्याची घटना ताजी असतांनाच पुन्हा एका भोई  तरुणास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  

भोई समाज  हे कृत्य कदापि सहन करणार नाही. भोई समाज हा शांतताप्रिय तथा  कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर असणारा समाज आहे.मात्र अशाप्रकारे भोई समाजावर अन्याय होत राहिला तर मात्र भोई समाज गप्प  बसणार नाही. जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या या गुंडांवर पोलिसांनी ताबडतोब कारवाई  करुन अटक करावी आणि शिक्षा करावी अशी मागणी भोई समाज सेना  तर्फे करण्यात येत असून ताबडतोब अटक न केल्यास भोई समाज सेना तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही  शासनाची  असेल.  

तरी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या गुंडांना ताबडतोब अटक करुन कायद्याचा बडगा दाखवावा व समाजातील लोकांना कायद्याचे संरक्षण द्यावे अशी मागणी भोई समाज सेना महाराष्ट्र प्रदेश संस्थापक भिलेशभाऊ खेडकर,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रोहितभाऊ शिंगाणे, कायदेशीर सल्लागार योगेशभाऊ मोरे,धुळे जिल्हाध्यक्ष आशुतोष वाडिले,धुळे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल वाडेकर,धुळे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव,  शिंदखेडा तालुकाध्यक्ष रोहिदास ढोले आणि इतर पदाधिकारी यांनी केली आहे.



1 टिप्पणी:

प्रसिद्ध