Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ जुलै, २०२०
रोजगार हमीतून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ..!
परंडा (राहूल शिंदे)दि.13 तालुक्यातील चिंचपूर बु येथे कोरोना संसर्गजन्य रोगाच्या काळात कामगारांना काम मिळावे यासाठी,शेत रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. उस्मानाबाद जि.प.उपाध्यक्ष श्री.धनंजय सावंत,उस्मानाबाद जि.प मा.सभापती रणजितसिंह पाटील,परंडा पं.स सभापती श्री.सतिश दैन, गटविकास अधिकारी चकोर साहेब, अभियंता बरबडे साहेब यांच्या हस्ते शेत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
शिंदेवस्ती-पाटीलवस्ती- भिलारेनगर पुनर्वसन गावठाण या रस्त्याच्या कामास एमआरजीएस योजेनेतून सुरुवात करण्यात आली.
यावेळी वामनभाऊ पालखी मार्ग लंगोटवाडी रोड - पांढरेवाडी पश्चिम हा मार्ग मुख्यमंत्री ग्राम सडक योजना किंवा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करावा याबाबतचे निवेदन परंडा तालुक्याचे विद्यमान आ.प्रा.तानाजीराव सावंत यांना जि.प.उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्यामार्फत देण्यात आले.
यावेळी सरपंच काशिनाथ लोकरे, उपसरपंच युवराजसिंह पाटील, ग्रामविकास अधिकारी लोखंडे, मा.जि.प सदस्य शिवाजी पवार,मा.सरपंच भिमा पवार इस्माईल शेख,तानाजी कासारे,मा.सरपंच बाळू मोरे,प्रदीप पाटील,मारुती पाटील,निलेश शिंदे,प्रकाश शिंदे, संतोष शिंदे,सोमनाथ शिंदे,अंकुश शिंदे,सिद्दु चव्हाण,राहुल शिंदे, सुग्रीव शिंदे,मधुकर अनभुले,विकास देवकर,धनू अनभुले यांच्या सह ग्रामस्थ कोरोना च्या पार्श्वभुमीवर शारीरिक अंतर ठेऊन,तोंडाला मास्क बांधून व नियमाचे पालन करुन उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा