Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

अमळनेर तालुक्यात बोथरा बंधूचे दातृत्व..! ग्रामीण रुग्णालयात केले मोठे दान..!


अमळनेर i प्रतिनिधी – (पंकज पाटील , उपसंपादक तरुण गर्जना)

‘कोरोना”च्या संकटकाळात अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात ३० बेडसाठी ऑक्सीजन लाईनचा लोकार्पण सोहळा पार पडला.

हर्ष बोथरा आणि भरत बोथरा या बंधूंनी यांचे वडील कै. प्रकाशचंद भवरलाल बोथरा यांचा कोरोनाच्या संक्रमाने मृत्यू झाला .त्यांच्या स्मरणार्थ ३० बेडसाठी व पुढील टप्यात ऑपरेशन वार्डात लागणारी ५ एकूण ३५ बेडसाठी ऑक्सीजन पाइप लाईन करण्याकरिता दोन लाख रुपये दान देऊन सामाजिक दायित्व दाखवले.

रोटरी क्लब ऑफ जळगाव ( वेस्ट ) व रोटरी क्लब, अमळनेर यांच्या समन्वयाने व मदतीने ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे ३० बेडची ऑक्सीजन पाईप लाईनचे लोकार्पण शुक्रवार रोजी ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे ३० ऑक्सीजन बेड बसविण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, गोरक्षण गाडीलकर, जळगाव जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष व चोपडा येथील शेतकरी चळवळीचे प्रणेते एस.बी.नाना पाटील यांचे मार्गदर्शनाने तसेच जळगाव जिल्हा रोटरीयन चंद्रकांत सत्रा व माजी अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांचे सहकार्याने सदरचे कामकाज पुर्ण झाले .

लोकार्पण  सोहळयासाठी भुमीपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील, माजी विधानपरिषद आमदार  स्मिता वाघ, उपविभागीय अधिकारी श्रीमती सिमा अहिरे,  तहसलिदार मिलिंदकुमार वाघ,  मुख्याधिकारी श्रीमती. विद्या पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे, सिनियर रोटरीयन  चंद्रकांत सत्रा, डॉ. अशिष, डॉ. संदिप जोशी, डॉ. राजेश पाटील, माजी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ जळगाव (वेस्ट), तुषार चित्ते , अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ जळगाव (वेस्ट), हर्ष प्रकाशचंद बोथरा, भरत प्रकाशचंद बोथरा , संजय इंगळे, उपाध्यक्ष रोटरी क्लब ऑफ जळगाव (वेस्ट) व  संजय चौधरी आदी उपस्थित होते.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध