Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १० जुलै, २०२०

बळीराजा ला रस्त्यावर येण्याची वेळ, बाजारपेठेत खतांच्या कृत्रिम तुटवडा..!



सत्रासेन प्रतिनिधी चोपडा सुभाष पाटील 

वरून राजा शेतकऱ्यावर मेहेरबान झाला आणि चांगला पाऊस पडला.मात्र शेतकऱ्यांच्या नशिबी दारिद्य अवस्था प्रत्येक वर्षी असतेच. जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या संचारबंदी सुरू असताना शेतकऱ्यांना युरिया खतासाठी मोठी धडपड करावी. बाजारपेठेत खते उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना खत मिळत नाही. युरिया व हवे ती इतर खतांसाठी आपण आपला जीव धोक्यात टाकून शेतकरी बाजारपेठांमध्ये फिरतांना दिसून येत आहे.

युरिया खताच्या मोठा तुटवडा चोपडा परिसरातील व्यापारी करीत असल्यामुळे शेतकऱ्यांना हा त्याच्या त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठेत अनेक दुकानावर खत उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना खत मिळत नाही. शेतकऱ्याला पिकाला येईन खत मारण्याच्या वेळेवर युरिया व हवे ते इतर खत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

आधीच करणाचे सावट आणि त्यात व्यापाऱ्यांची मनमानी आणि शासकीय अधिकारी गप्प बसले आणि शेतकऱ्यांना खतासाठी  आपला जीव धोक्यात टाकून बाजारपेठेत भर पावसात खरेदीसाठी फिरावे लागत आहे. तरी शेतकऱ्यांना हवे ते खत मिळत नाही. याबाबत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित दुकानदारांचे तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध