Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १९ जुलै, २०२०
स्वच्छता,मनोरुग्णसेवा व बेवारस लोकांचा माणसातील देवदूत. !
तुळजापूर (राहूल शिंदे)दि.19 महाराष्ट्राचे आराध्यदैवत कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पावन तुळजापूर नगरीत माणसातील देवदूत श्री.पंकज शहाणे नावाचा एक स्वच्छता देवदूत पाहण्यास मिळतो खरोखरच ज्याप्रमाणे संकट समयी भक्तांच्या हाकेला देव धावून येतो त्याप्रमाणेच पंकजजी तुळजापूर मध्ये कधी बसस्थानकाची,सार्वजनिक स्वच्छतागृहाची, सार्वजनिक स्थळांची झाडूने स्वच्छता करतात पाण्याच्या टॅंकरद्वारे परिसर धुवून स्वछ करतात.
तीर्थक्षेत्र परिसरातील निर्माल्य स्वछ करत आपले समाजिक कार्य जोपासत आहेत.जिल्ह्यातील ऐतिहसिक स्थळांची स्वच्छता करून,स्वछ भारत मिशनचा संदेश सर्व जनतेपर्यंत पोहचवत आहेत. पंकज नावाचा तरुण आता सर्व तुळजापूर पावन नगरीत आपल्या कार्यामुळे चर्चेत आहेत,सर्व तुळजापूरकर यांच्या कार्याला दाद देत आहेत.
जगावर जागतिक करोना संकट आल्यामुळे त्याला तुळजापूरनगरी देखील अपवाद ठरलेली नाही, अनेक बेवारस,अत्यंत गरजू , निराधार लोक हे भुके वाचून व्याकुळ होऊन हतबल झालेले त्यांना दिसले अशा लोकांना गाव बंद असल्याने कुणी भीक वगैरे काही देत नाही,हाताला कोणतेही काम कोणी देत नाही,हॉटेल वगैरे जवळपास बंदच आहेत.दारोदार भीक हे लोक मागत नाहीत मग उपाशी पोटी बसून असतात बसस्टँड मध्ये किंवा कुठंतरी आडोस्याला हे त्यांना माहिती होते कारण पंकज शहाणे व त्यांच्या सौभाग्यवती आपल्या लहान कन्यासोबत गेली पाच- सहा वर्षापासून लोकसेवा फाउंडेशन च्या माध्यमातून या बेवारस,मनोरुग्ण लोकांसाठी कार्य करत आहोत ..मग अशा परिस्थितीत आता ह्यांना जेवण कसे द्यावे याचा विचार करून त्यांनी स्वतः व्यक्तिगत पैश्यातून पुलाव राईस विकत घेऊन वाटप चालू केले,
त्यांनी स्वतः,पत्नी छोटी मुलगी सोबत घेऊन सर्व तुळजापूर मध्ये फिरतात व असे निराधार लोक त्यांच्या चांगल्या ओळखीचे असल्याने ते लगेच आपुलकीने जवळ येतात व समाधानाने जेवण घेऊन जातात तसेच त्यांनी शिवभोजन थाळी बद्दल विचारणा केली पण त्यांना 5 रुपये द्यावे लागतात म्हणून हे निराधार लोक तिकडे फिरकत नव्हते कारण अश्या लोकांकडे 5 रु सुद्धा नाहीत सध्या च्या संकटात. म्हणून त्यांनी व्यक्तिगत ह्या सर्व लोकांचे पैसे भरतात व ह्या लोकांना आता रोज अन्नदान करत आहेत.त्यांच्या पोटापाण्याची सोय करत आहेत.
तुळजापूरनगरीत अनेक लोक दर्शनासाठी येतात.यात भिकारी,बेवारस,मनोरुग्ण देखील मोठ्यासंख्येने दिसतात.त्यांच्याकडे लोक दुर्लक्ष करत असतात परंतू अशा लोकांची सेवा करणे त्यांना कपडे देणे,अंथरूण-पांघरूण देण्याचे काम यांनी केले आहे.सण उत्सवात त्यांना गोडाचे जेवण देणे.अशांना दवाखान्यात नेहून त्यांच्यावर उपचार करून,स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना स्वगृही सुखरूप सोडवण्याचे काम देखील करत आहेत.
खरोखरच पंकज यांच्या कामाकडे पहिल्यावर माणसातील देवदूताचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.खूप कौतुकास्पद असे कार्य आपल्या परिवारातील सदस्यामार्फत केले आहे व करत आहेत.सलाम अशा देवदूताला.
✍️ राहूल शिंदे(तरुण गर्जना,उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा