Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १९ जुलै, २०२०
रावेर येथे १२२५ नागरिकांची तपासणी ७३५० लोकांचे सर्वेक्षण..!
-प्रतिनिधी अजीज शेख रावेर-
खऱ्या अर्थाने शासनाचे कार्य करणारी संस्था म्हणजे कोविड केअर युनिट- आमदार शिरीष चौधरी
डॉ सुयोग चौधरी,जळगांव यांची कॅम्प मध्ये तपासणी
रावेर शहरात मध्यवर्ती नगर पालिका ,शादी हाल येथे जळगाव केअर युनिट व मुस्लिम मुततेहदा कौन्सिल मार्फत सर्वेक्षण व आरोग्य तपासणी करण्यात आली होती यात ७३५० नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले व त्या पैकी १२२५ लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात आला.
उद्घाटन समारंभ
कार्यक्रमाचे औपचारिक उदघाटन रावेर-यावल मतदार संघाचे आमदार शिरीष दादा चौधरी यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले त्या वेळी व्यासपिठावर नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद,प्रांत डॉ अजित थोरबोले, तहसीलदार उषा राणी देवगुणे,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे,केअर युनिट चे अध्यक्ष गफ्फार मलिक,फारूक शेख सह नगर सेवक आसिफ मोहम्मद,अय्युब खान ,शेख कलीम असद खान,मुफ्ती अतिक, व शफी सर,सलीम सर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फारूक शेख व आभार समनव्यक फिरोज खान यांनी मानले.
शिरीष दादा यांचे मार्गदर्शन
शासनास खरी गरज आहे ती गरज ओळखून कोविड केअर युनिट चे कार्य चालू असून कौटुंबिक सर्वेक्षण करून त्यातील रुग्णाला तपासून मोफत औशोधोपचार दिला जात आहे व लोकांच्या मनातील भीती दूर करीत आहे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले
प्रशासना तर्फे रामदास वाकोडे, पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शन
नागरिकांनी आपली सुरक्षा स्वतः करावी मास्क लावून सामाजिक अंतर ठेवावे व कोविड केअर युनिट सारखे कॅम्प आयोजन करावे असे आव्हान केले.
अध्यक्षीय अब्दुल गफ्फार मलिक यांचे मार्गदर्शन
भारत देश हा सर्व जाती धर्माचे असून आजार हा जात,पात बघून येत नाही परंतु काही लोक यांच्यात सुद्धा राजकीय रंग देऊन जातीय वाद करण्याचा प्रयत्न केला परंतु शिरीष दादा, अजित थोरबोले यांच्या सारखे बांधव आहे तो पर्यंत या भारतात जातीय वाद वाढणार नाही असे भावनिक आव्हान केले.
डॉ सुयोग चौधरी मुख्य आकर्षण
जळगाव येथील फिजिशियन एम डी मेडिसिन डॉ सुयोग चौधरी यांनी सुद्धा वैद्यकिय शिबिरात सहभाग घेऊन पूर्ण एक तास तपासणी केली त्यांच्या टेबलावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती.
समारोपीय कार्यक्रम
रावेर व मारुळ येथील डॉक्टरांनी शिबिरात सहभाग नोंदविला व कोरोना च्या युद्धात सहकार्य केले म्हणून त्यांचा सुध्दा प्रमाण पत्र देऊन आमदार शिरीष दादा चौधरी,मुफ्ती अतिकुर रहेमान व गफ्फार मलिक यांच्या हस्ते गौरव करण्यात आले.
रावेर येथे महिला ६ डॉक्टर सह २१ डॉक्टरांची सेवा
डॉ.शरीफ शाह,डॉ.जावेद,डॉ. अब्दुल रहीम, डॉ. वसी अहमद, डॉ.वकार,डॉ.तौसिफ शेख, डॉ.रियाज़ बागबान, डॉ.फिरोज खान,डॉ.अब्दुल वहाब, डॉ.महजबीन सैय्यद, डॉ.निलोफर,डॉ.आफरीन शेख मुख्तार,डॉ.सायमा असलम खान, डॉ. निशाहत अब्दुल वहाब,( सर्व जळगांव)
डॉ. सैय्यद मोहम्मद हनिफ़ ,डॉ. शाहिद सैय्यद, डॉ.मोहम्मद अवसाफ़,डॉ.रमीज़ इक़बाल,( सर्व मारुळ)
डॉ. इरफान शेख, डॉ. यास्मीन खान,डॉ. हबीब मालिक,डॉ. वसीम शेख(सर्व रावेर)
रावेर येथील कार्यकर्ते
ऐजाज अहमद,रहमान मलिक,सैय्यद अफसर,सैय्यद ज़ाकिर,दानिश खान,मोइन सर,शैख़ सलीम ,फिरोज एम पी जे, शोएब खान,निजामुद्दीन, फिरोज खान, सलीम शेख, नासिर अहमद, शेख मोईन,सैयद अफसर यांनी प्रयत्न केले.
जळगाव येथील योद्धे कार्यकर्ते
अजहर हुसैन,अरशद खान,इब्राहीम हैफिज़
आमिर शेख, अनिस शाह,जुलकर नैन,आबिद हारून,अतिक शेख, रफिक मानियार, सलीम इमाम,सादिक सर,अय्युब सर, मुश्ताक सर,कालु शेख नुरा, सैयद अनिस,अरफात मसूद,यांनी कार्य केले.
फोटो
१) फिट कापून उदघाटन करतांना आमदार शिरीष चौधरी,नगर अध्यक्ष दारा मोहम्मद,प्रांत डॉ अजित थोरबोरे,तहसीलदार उषा राणी,पो नि रामदास आकोडे,गफ्फार मलिक,मुफ्ती अतिक व फारूक शेख आदी दिसत आहे
२) शिबिरात डॉक्टर सुयोग चौधरी तपासणी करतांना
३) डॉ सुयोग चौधरी सोबत सर्व डॉक्टर व आयोजक समूह फोटो
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा