Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २२ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
वडाळा पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या गुरुगोविंद सिंग शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना विभागप्रमुख निलेश साळुंखे यांनी शिक्षण उपसंचालक यांना निवेदन दिले
वडाळा पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या गुरुगोविंद सिंग शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना विभागप्रमुख निलेश साळुंखे यांनी शिक्षण उपसंचालक यांना निवेदन दिले
इंदिरानगर वार्ताहर : वडाळा पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या गुरुगोविंद सिंग शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना विभागप्रमुख निलेश साळुंखे यांनी शिक्षण उपसंचालक यांना निवेदन दिले
निवेदनात म्हटले आहे.
की गुरुगोबिंदसिंग पब्लिक स्कूल वडाळा पाथर्डी रोड याशाळेत प्रवेश घेणे साठी नियमबाह्य्य कँपिटेशन फी व बिल्डींग फंड रोख स्वरुपात मागणी केली
इयत्ता ३ रीत वरील शाळेत प्रवेश घेण्यासाठी ५५२५०/- रकमेची नियमबाह्य्य पणे मागणी केली .या रकमेची विभागणी अर्ज शुल्क (फोर्म फी) ५००/- प्रवेश शुल्क ,७५००/- शिक्षण शुल्क ( ट्युशन फी ) १६२००/- प्रथम सत्र,१३५०/- द्वितीय सत्र, १३५०/- क्लब शुल्क ४०००/- ओळख पत्र डायरी ,इतर - २५० एकूण रक्कम-३११५० उर्वरित रक्कम २४१००/- ही बिल्डींग फंड म्हणून रोख घेणार चेक चालणार नाही असे शाळा प्रशासन व संस्था चालकांनी सदर पालकांना सांगितले
संस्था चालकांनी शाळा प्रवेशासाठी दारोदार भटकणाऱ्या पालकांच्या असहाय्यतेचा गैर फायदा घेवून महाराष्ट्र शासनाच्या “शालेय संस्था देणगी विरोधी कायदा (कँपिटेशन फी प्रतिबंध कायदा )१९८७ च्या सर्व नियमांचे उल्लंघन करत असुन
तसेच शैक्षणिक साहित्य ( पुस्तके ,वह्या ) व्यवस्थापनाने शाळेने ठरवून दिलेल्या विशिष्ट पुरवठादार यांच्या कडून घेण्यास भाग पाडत आहेत.शाळेने वर्ग प्रमाणे दुकानात जाण्यासाठी वेळ व मार्ग असलेले एक पत्रक पालकांना पाठवले आहे .त्यामुळे पालकांना त्याच ठिकाणाहून शैक्षणिक साहित्य घेणे भाग पाडले जात आहे
संस्था चालक ट्रस्टी यांच्या संस्थेतील सर्व शाळा,कॉलेजातील सर्व आर्थिक गैरव्यवहारांचा शोध चौकशी समिती नेमून घेण्यात यावा.
या आर्थिक गैरव्यवहारातील पालकांच्या शालेय फी द्वारे नफेखोरी रक्कम ,वसूल केलेली कँपिटेशन फी व बिल्डींग फंड पालकांना परत करण्यात यावा .नियमबाह्य ट्युशन फी, कँपिटेशन फी, बिल्डींग फंड घेणाऱ्या शाळेस नियमाप्रमाणे १० लाख रुपये दंड व संचालक ट्रस्टी मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात यावा अन्यथा या विरोधात आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे यावेळी निलेश साळुंखे,सुयश पाटील, आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा