Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ जुलै, २०२०
स्वाभिमानीचे तहसिल समोर विज बिल जाळो आंदोलन..!
शेगाव(प्रतिनीधी उमेश राजगुरे) संपुर्ण देशभरात सर्वत्र काण्याकोप-यात कोरोणा पोहचल्याने महामारीची परीस्थिती निर्माण झाली आहे. ही परीस्थिती आटोक्यात आणन्या करीता शासनाने वेळोवेळी लॉकडाउन केला.
त्या लॉकडाउनच्या काळात विज दरवाढ करुण घरगुती विज बिलात प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे जणतेच्या गळ्यात वाढीव बिलाचा फास न टाकता घरगुती विज बिल माफ करा. या मागणीसाठी माजी खासदार राजु शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनाचे आज राज्यभर प्रतिसाद उमटले आहेत.
लाॅकडाउनच्या काळामध्ये प्रत्येकाचे घरगुती वीजबिल भरमसाठ वाढुन आले आहे. याच काळात विज दरवाढ सुद्धा झालेली आहे. कोरोनामुळे हातांना काम नसल्याने बेरोजगारी वाढली आहे. याबाबत शासनाला वांरवांर कळवून सुद्धा याची फारशी दखल शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे राजु शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनात प्रतिसाद देत शेगाव शहर व तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसिलच्या आवारात बिलाची होळी करुन शासनाचा निशेद करण्यात आला.
त्या वेळी वाढीव बिला विरोधात प्रचंड घोषनाबाजी करत कार्यकर्त्यांनी सर्व परीसर दणानुन सोडला होता या वेळेस पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुध्दा लावण्यात आला होता. या वेळी कोरोणा काळातिल घरगुती तिन महीन्याचे विज बिल माफ करण्यात यावे असे तहसिलला निवेदन देण्यात आले या आंदोलनात स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे प्रेम मानकर,विजय सावळे, महादेव बावसकर,अजय सावळे सागर तायडे, शंकर सोनोने, मुकेश अंजनकर, नितीन तायडे, शिवाजी कोकाटे, स्वाभिमानी कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा