Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १९ जुलै, २०२०

शिरपूर शहर पोलिसांनी बनावट दारूचा कारखाना केला उध्वस्त आरोपींना अटक मुद्देमाल हस्तगत..! सदर गुन्ह्यातील प्रमुख हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत..!



शिरपूर प्रतिनिधी धुळे जिल्ह्यात मा. पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सो यांनी अवैध व्यवसायांवर कारवाई बाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार  शिरपूर शहरात एक बनावट देशी विदेशी दारू बनवण्याचा कारखाना सुरू असल्याबाबतचे माहिती मिळाली होती.

सदर माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी शिरपुर शहर पोलीस ठाणे  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करून शहर भागातील अंबिकानगर व दूध डेअरी कॉलनी परिसरातील बनावट दारूचा कारखाना उध्वस्त करून येथून 7,37,749 रुपये किमतीच्या बनावट दारू साठा, बनावट दारू साठा बनवण्याचे साहित्य व नाव दारू वाहतूक करणेकामी वापरण्यात येणारे वाहन टाटा कंपनीचे आयशर गाडी, एक सेंट्रो कार, होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल तीन  संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम शिरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सदर गुन्ह्यातील प्रमुख हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक सो चिन्मय पंडित, मा.अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ सो,उपविभागीय पोलिस अधिकारी मा. अनिल माने सो यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चंद्रकांत पाटील, सपोई संदीप मुरकुटे कॉन्स्टेबल उमेश पाटील, योगेश कोळी,बापूजी पाटील, नरेंद्र शिंदे ,स्वप्निल बांगर ,अमित रणमळे,प्रवीण गोसावी, पंकज पाटील, मुजाहिद शेख, यांच्या पथकाने केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध