Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १० जुलै, २०२०
दुचाकी वाहनांसाठी..! नवीन मालिका..!
धुळे, दि.9:प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, धुळे यांच्यातर्फे सोमवार 13 जुलै 2020 पासून दुचाकी वाहनांकरीता नवीन वाहन मालिका MH18 BT ही सुरू करण्यात येणार आहे.
या नवीन मालिकेमध्ये 0001 ते 9999 पर्यंतचे क्रमांक असून ज्यांना आकर्षक अथवा उडते क्रमांक पाहिजे असतील त्यांनी 13 जुलै 2020 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज भरुन कार्यालयीन वेळेत नवीन वाहन नोंदणी विभागात सादर करावे.
या अर्जासमवेत क्रमांकासाठी आवश्यक शुल्काचा REGIONAL TRANSPORT OFFICER, DHULE यांच्या नावे असलेला एक धनाकर्ष स्वत:च्या स्वाक्षरीने सील केलेल्या बंद पाकिटात सादर करावा. या दिवशी फक्त दुचाकी वाहन संवर्गाकरीता धनाकर्ष स्वीकारण्यात येतील.
एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास विहित शुल्काव्यतिरिक्त जास्त रकमेचा धनाकर्ष अशा प्रकारे अतिरिक्त धनाकर्ष सीलबंद पाकिटात सादर करावा.
त्यापैकी ज्या व्यक्तीचा धनाकर्ष हा अधिक रकमेचा असेल त्या व्यक्तीस क्रमांक बहाल करण्यात येईल. 13 जुलै 2020 नंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी, धुळे यांनी म्हटले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा