Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
एसीपीएम मेडिकल कॉलेजचा संपर्क तुटला..! नकाणे तलाव सांडव्याचचा प्रवाह रस्त्यावर रूग्णांचे हाल..!
एसीपीएम मेडिकल कॉलेजचा संपर्क तुटला..! नकाणे तलाव सांडव्याचचा प्रवाह रस्त्यावर रूग्णांचे हाल..!
धुळे:प्रतिनिधी सचिन वाफेकर:मोराणे, हरण्यामाळ परिसर तसेच नकाणे तलाव क्षेत्रात समाधानकारक पाउस पडल्यामुळे साक्री रोड ते हरण्यामाळला जाणा-या रस्त्यावर तलावाच्या सांडव्यातील पाण्याचा प्रचंड प्रवाह वाहू लागला. त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचाही संपर्क तुटला. याठिकाणी येणारे रूग्ण, गर्भवती महिला यांचे प्रचंड हाल झाले. डॉक्टर्स तसेच कॉलेजचे व हॉस्पिटलचे कर्मचारी पोहचू न शकल्याने अनेक शस्त्रक्रिया रदद कराव्या लागल्या. नकाणे तलाव परिसरात शुक्रवारी रात्री जोरदार पाउस पडला.
त्यामुळे काही तासांतच नकाणे तलावाला जोडणा-या सांडव्यातील पाण्याची पातळी वाढून तलाव ओसंडून वाहू लागला. तलावातील पाणी रस्त्यावर आले. पाण्याचा एक मोठा प्रवाह जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या भिंतीला लागून रस्त्यावर आला. कॉलेजच्या कोप-यावरील रस्ता आधीच पावसाने खचल्याने अक्षरक्ष: याठिकाणी पाण्यामुळे धबधबा तयार झाल्याचे चित्र निर्माण झाले. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने रात्रीपासून अनेक वाहने, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, 108 रूग्ण्वाहिका, रूग्णांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये अडकून पडले.
तर दुसरीकडे शनिवारी नेहमीप्रमाणे रूग्णसेवा देण्यासाठी जाणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी अडकून पडल्याने अनेक महत्वाच्या शस्त्रक्रिया रदद कराव्या लागल्या. याशिवाय रूग्णालयाला लागणारे अत्यावश्यक साहित्य जसे ऑक्सिजन सिलिंडर, शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्यही रूग्णालयात पोहोचवता आले नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचा-यांचे व डॉक्टरांचे आतेानात हाल झाले. मागील वर्षीच्या पावसातही याभागात पाणी साचून रस्ता बंद झाला होता. त्यामुळे हॉस्पिटलच्या प्रशासनाने जिल्हाधिकीरी, आपत्ती व्यवस्थापन तसेच जलसंपदा विभागाला पत्र देवून ही समस्या दूर करण्याची मागणी केली होती.
याशिवाय या रस्त्यावर मोरीचे बांधकाम करून रस्ता उंच करण्याची मागणीही करण्यात आली होती. परंतू ती मागणी पूर्ण न केल्याने पुन्हा हरण्यामाळचा धुळे शहराशी संपर्क तुटण्याची वेळ आली. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हिरे मेडिकल कॉलेज कोविड रूग्णालय घोषित झाल्यानंतर सामान्यांवर केवळ एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. परंतु रस्ताच बंद झाल्यामुळे याठिकाणी रूगणांना पोहोचता आले नाही. अनेक गर्भवती महिला सकाळी अडकून पडल्याचे चित्र होते.
तर बाहेरगावाहून येणारे डॉकटर्स, सर्जन, भूलतज्ञ सारेच रस्ता बंद असल्याने अडकून पडल्याचे पहायला मिळाले. दरम्यान धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, तहसिलदार, जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या डॉ. ममता पाटील,अधिष्ठाता डॉ.विजय पाटील, दंत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण दोडामणी आदींनी या भागाची पाहणी केली. यावेळी जिल्हा प्रशासनाला नेमकी अडचण लक्षात आणून देण्यात आली. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी आमदार कुणाल पाटील यांच्यासह हॉस्पिटल प्रशासनाने केली.
यावेळी हरण्यामाळ गावचे ग्रामस्थ, या भागात व्यवसाय करणारे नागरीक उपस्थित होते.
रस्त्यामुळे जीव धोक्यात
नकाणे तलाव सांडव्याच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह या रस्त्यावरून जात असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. डॉक्टर्स तसेच आरेाग्य कर्मचारी यांना वापरण्यासाठी केवळ हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे हा रस्ता बंद झाल्यास आरोग्य सेवेवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे हा रस्ता तात्काळ दुरूस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.
याठिकाणी उंच मोरी बांधण्याची गरज आहे. रात्रीच्या वेळी पाण्याचा प्रवाह आल्यास रूग्ण तसेच कर्मचा-यांचा जीव धोक्यात जावू शकतो. त्यामुळे हा रस्ता तात्काळ सुधारण्याची अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. यासंदर्भात जिल्हाधिकारी, तहसिलदार, जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन अशा सर्वच कार्यालयांकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. तरीदेखील दखल घेण्यात आलेली नाही.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा