Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २० जुलै, २०२०

धुळे शहरात शुक्रवार दिनांक २४/७/२०२० रोजी दुपारी ४-०० वाजेपासून ते सोमवार दिनांक २७/७/२०२० सकाळी ८.०० वाजेपावतो जनता कर्फ्यु जाहीर..!



धुळे प्रतिनिधी:धुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असून रुग्ण संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर कडक कार्यवाही व उपाय योजना करण्यांच्या दृष्टीने शहरातील सर्व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच मनपा पदाधिकारी,गटनेते. अधिकारी तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी यांची एकत्रित बैठक आज रोजी सकाळी ११.३० वाजतां धुळे मनपा सभागृहात महापौर श्री चंद्रकांत सोनार यांनी आयोजित केलेली होती. सदर बैठकीस आयुक्त श्री.

अजीज शेख, तसेच भाजपा महानगराध्यक्ष श्री. अनुप अग्रवाल, उपजिल्हा पोलीस अधिक्षक श्री. राजू भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

धुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असून मनपा व पोलीस प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाय योजना करुनही नागरीकांची गर्दी कमी होत नाही. तसेच प्रशासनामार्फत याबाबत मोठयाप्रमाणावर जनजागृती करण्यांत आलेली असत सोशल डिस्ट्सींग, मास्कचा वापर न करणे व विनाकारण रस्त्यावर अनावश्यक गर्दी करणे या प्रकारामुळे रुग्ण संख्येचा वाढता धोका निर्माण झालेला असल्याने आजच्या बैठकीत कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शहरात शुक्रवार दिनांक २४/७/२०२० रोजी दुपारी ४-०० वाजेपासून ते सोमवार दिनांक २७/७/२०२० सकाळी ८.०० वाजेपावतो जनता कप्-ु जाहीर करण्यांचा निर्णय घेण्यांत आलेला आहे.

या कालावधीत मेडिकल व फक्त घरपोच दुध सेवा यांना सवलत असून उर्वरीत सर्व व्यापारी संस्था प्रतिष्ठाने हॉकर्स व अन्य सर्व व्यवसाय (भाजीपाला, फळविक्री, किराणा यासह ) पूर्णपणे बंद राहणार आहेत.नागरीकांनीही या कालावधीत घराच्या बाहेर निघण्यास मज्जाव करण्यांत आलेला आहे.

आपल्या शहरातील कोरोना संसर्गाचा धोका कमी व्हावा व या शहराची व सर्व नागरीकांची आरोग्याची काळजी म्हणून हा निर्णय नाईजास्तव घेण्यांत येत असून प्रत्यक्ष मी व माझ्या कुटुंबियांनी कोरोनाच्या दुःखद प्रसंगाचा सामना केलेला असून इतरांवर अशी वेळ येवू नये व यानिमित्ताने नागरीकांनीही आपल्या जबाबदारीचे भान ठेवून आता व भविष्यांत नियमाचे पालन करावे यासाठीच हा जनता कप-यूं केवळ नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी घेण्यात येत असल्याचे बैठकीत महापौर श्री चंद्रकांत सोनार यांनी आपल्या मनोगतातून भावनिक आवाहन केले.

या बैठकीत आयुक्त श्री.अजीज शेख तसेच महानगराध्यक्ष श्री. अनुप अग्रवाल, पोलीस उपअधिक्षक श्री.राजू भुजबळ,स्थायी समिती सभापती श्री.सुनिल बैसाणे,व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी श्री. नितीन बंग, महादेव परदेशी, सुभाष कोटेचा, श्री. ताथेड यांनी मनोगत व्यक्त केले.

या बैठकीस उपमहापौर सौ. कल्याणीताई अंपळकर,विरोधी पक्षनेते श्री साबीरशेठ, अति.

आयुक्त श्री.गणेश गिरी,नगरसेवक श्री.देवादादा सोनार, श्री.संजय पाटील, श्री. किरण अहिरराव, श्री. रावसाहेब नांद्रे, गटनेते श्री.अमीन पटेल,भिकनअप्पा वराडे, प्रवीण अग्रवाल, सहा. आयुक्त श्री.

विनायक कोते. पल्लवी शिरसाठ,तसेच विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध