Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ जुलै, २०२०

कृषी केंद्र संचालकांनी पुकारला तीन दिवसांचा संप..! तहसिलदारांना निवेदन सादर..!

                             

जामनेर प्रतिनिधी (संजय सूर्यवंशी)
राज्यभरात सध्या सोयाबीन,मका आणि इतर बियाणे संदर्भात शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारींवर शासनाच्या कृषी विभागाकडून कोणतीही शहानिशा न करता कृषी केंद्र संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येत असून या प्रकारात न्यायालयाने सुद्धा खातरजमा न करता गुन्हे दाखल करा असे आदेश काढलेले असल्याने शासनाचा निषेध करण्यासाठी शहरातील कृषी केंद्र व फर्टिलायझर संचालकांनी तहसिलदार अरुण शेवाळे यांना आज दि.९ रोजी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
                        
आम्ही सीलबंद व शासनाची परवानगी असलेलाच माल खरेदी विक्री करीत असतो मग यात आमचा काय दोष  अश्या अनेक मुद्यांसंदर्भात आपल्या राज्य संघटनेने शासन दरबारी आपले बद्दल चुकीचे अर्थ काढले जात असल्याने  संघटनेने राज्यव्यापी बंदची हाक दिलेली आहे त्यामुळे आपल्याला आपल्या न्याय व मागण्यांसाठी तालुकाभरात दि.१० ते १२ जुलै दरम्यान तीन दिवसीय बंद पाळण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.

तालुका कृषी अधिकारी यांना सुध्दा सदर निवेदनाची प्रत देण्यात आलेली आहे. निवेदन देतेवेळी अभय बोहरा,नंदू पाटील, विनोद चोरडिया,दिपक पाटिल,अमित धारीवाल,मुकेश बोहरा आदिंसह व्यापारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध