Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ जुलै, २०२०

राजगृहावर हल्लेखोरांना तात्काळ अटक करा अशी मागणी महात्मा फुले उत्सव समितीच्या वतीने करण्यात आली..!



शेगाव प्रतिनिधी उमेश  राजगुरे: महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वास्तू असलेल्या राजगृह वर हल्लेखोरांनी हल्ला केला दि ७.७.२०२० रोजी अज्ञात हल्ले खोरांनी जगातील फुले शाहू आंबेडकरी जनतेची अस्मिता
असलेल्या राजगृहावर हल्ला केला. 


राजगृहावरील हल्यामुळे फुले शाहू आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे.

राजगृह हे बौध्दांच प्रतिक आहे. आमच काळीज आहे. हल्लेखोर हे मनुवादी आतंकी प्रवृत्तीचे असल्याचा आमचा
ठाम विश्वास आहे. राजगृहामध्ये राहत असलेल्या आंबेडकर परिवाराला सुध्दा हा टार्गेट करण्याचा हा कुटील डाव
आहे. 

दहशत निर्माण करून तुम्ही घरात बसा हा ईशारा यातून दिसतोय. राज्य सरकारने या घटनेला गांर्भीयाने घेवून तत्काळ सखोल चौकशी करत या घटने मागील मनोवादी प्रवृत्तीच्या मुस्क्या आवळाव्यात. महात्मा फुले उत्सव समिती शेगाव मागणी करते की, राजगृहाला कायम स्वरुपी संरक्षण देण्यात यावे. देशभरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या एतिहासीक आंबेडकर भवन सहित सर्व वास्तुंना संरक्षण देण्यात यावे. आंबेडकर परिवाराला तत्काळ संरक्षण देण्यात यावे. मनुवादी हल्ले खोरांना तात्काळ अटक करण्यात यावी व त्यांच्या मागील मास्टर माईंड कोण आहेत याचा तपास करुन त्यालापण लवकरात लवकर अटक करण्यात यावी. हल्लेखोरांना
तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आज तहसील कार्यालयात निवेदन देऊन करण्यात आले महात्मा फुले उत्सव समिती यांच्यावतीने करण्यात आले यावेळी गजानन हाडोळे संदीप फुसे मयूर काठोळे दिनेश घाटोळ महादेव घाटोळ कुशल दांगटे सागर त्यांची उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध