Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १० ऑगस्ट, २०२०
भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांच्यासह कुटुंबातील सहाजन पॉझिटिव्ह..!
परंडा (राहूल शिंदे) दि.10 भाजपाचे सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांच्यासह कुटुंबातील 6व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. काही दिवसापूर्वी आ.ठाकूर यांच्या आई आजारी असल्याने मंगळवारी कुटुंबातील सर्वांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली होती.
ठाकूर यांच्या कुटूंबातील 6 सदस्य कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला आहे. रविवारी पून्हा सदस्य व संपर्कातील सर्वांचे आरटीपीसीआर करण्यात आले. दरम्यान कुटूंबातील आणखी 3 तर संपर्कातील 3 जण बाधित असल्याचा अहवाल आला आहे.
अजूनही 3 जणांचे अहवाल येण्याचे बाकी असून आमदार ठाकूर यांच्यासह सर्वांची प्रकृती चांगली असल्याची माहिती ठाकूर यांनी फेसबुकद्वारे प्रसारित केली आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनीही कोरोना तपासणी करुन घ्यावी असेही ठाकूर यांनी आवाहन केले आहे.
कोरोनाच्या 4 महिन्यांच्या काळापासून स्वतःची परवा न करता सर्व सामन्य जनमाणसांत जाऊन कार्य करत आहेत.नुकतेच शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळावा म्हणून रस्तारोको आंदोलन करून प्रश्न मांडला. जनसामन्याचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.साहेब लवकर बरे व्हावे यासाठी नागरीक प्रार्थना करत आहेत.
मी 3 ऑगस्टपासून बाहेर कोणाच्याही संपर्कात नाही. काळजीपोटी अनेकांचे फोन येतात, मात्र सर्वांना उत्तर देणं शक्य नाही. मोबाईल संदेशाद्वारे कामासाठी उपलब्ध असेन.
सुजितसिंह ठाकूर, प्रदेश सरचिटणीस, भाजपा.
जिल्ह्यातील दोन आमदारांना कोरोना
आ. ठाकूर यांच्यापूर्वी उमरग्याचे शिवसेना आ. ज्ञानराज चौगुले यांना कोरोनाची बाधा झाली होती. लोकप्रतिनिधीच कोरोना बाधित होत असल्याने सामान्य जनता हतबल झाली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा