Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

शेळगाव खबरदारीचा उपाय म्हणून..! प्रशासनाच्या वतीने सील,आज नवे 3 रुग्ण आढळले..!



परंडा(राहूल शिंदे) दि.9 तालुक्यातील शेळगाव येथे आज 3 व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.आजपर्यंत शेळगाव येथे कोरोनाचे 24 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत,उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण 02 तर 01 जणाचा बळी गेला आहे.सद्यःस्थितीला 21रुग्ण उपचार घेत आहेत.

आज शेळगाव येथे प्रशासनाच्या वतीने अंभी पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक जी.बी पालवे यांनी गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, व शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून पूर्ण गाव सील करण्यात आले.व आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. 

प्रत्येक गावाने स्वतः होऊन आपापल्या गावात योग्य प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी खूपच अत्यावश्यक कामांसाठीच योग्य खबरदारी (मास्क,सीनेटायझरचा वापर,दोन व्यक्तीमध्ये सुरक्षित अंतरठेवणे) घेऊन बाहेर पडणे आवश्यक आहे.वारंवार येणाऱ्या प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा,अपवावर विश्वास ठेऊ नका व कोणत्याही प्रकारच्या अपवा पसरवू नका, प्रशासनाला सहकार्य करा. घरीच रहा-सुरक्षीत रहा!, काळजी करू नका -काळजी घ्या!  आपण सर्व मिळून कोरोनाला हरवू या ! ! अशा प्रकारच्या सूचना देऊन जनजागृती केली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध