Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०
देशाच्या इतिहासात,शाळेत प्रथमच विद्यार्थ्यांविना ध्वजारोहण होणार..!
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.14 देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता येणारा स्वातंत्र्यदिन कसा साजरा करावा हा सरकारसमोर एक प्रश्न होता. येणाऱ्या शनिवारी साजरा होणारा भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन असेल.
राज्यात या स्वातंत्र्यदिनी मागील काही महिन्यांपासून कोरोना विरुद्ध लढत असलेल्या कोविड योद्ध्यांचा सन्मान केला जाईल. या वर्षी विविध ठिकाणी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी सफाई कामगार, डॉक्टर आणि आरोग्य सेवकांना निमंत्रित केले जाईल.तसेच कोरोनावर यशस्वीरीत्या मात केलेल्या रुग्णांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेऊन एक प्रकारे त्यांच्या कामाची आणि जिद्दीची स्तुती केली आहे.स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण समारंभ सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून करण्यात येणार आहे. प्रत्येक व्यक्तीला मास्क घालने बंधनकारक असणार आहे. राज्याचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम मुख्यमंत्र्याच्या उपस्थित मंत्रालयाच्या आवारात होणार आहे.
तसेच विभागीय स्तरावर आणि जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणीही ध्वजारोहण कार्यक्रम केले जाणार आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
या कार्यक्रमाला कोरोना रोखण्यात जे महत्वाची भूमिका बजावत आहेत त्यांना निमंत्रित केले आहे. यामध्ये ज्या सफाई कामगार, डॉक्टर, आरोग्य सेवक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी योगदान दिले त्यांना निमंत्रित करून त्यांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच ज्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे त्यांनाही निमंत्रण दिले जाईल. यामुळे या सर्वांना हुरूप येऊन ते नव्या दमाने कोरोनाला हारवण्यासाठी सज्ज होतील अशी अपेक्षा आहे.
या वर्षी इतिहासात प्रथमच शालेय स्तरावर विद्यार्थ्यांविनाच स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे.मुख्याध्यापकासह जास्तीत जास्त 10 जणांना उपस्थितीत रहाता येणार आहे,कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता म्हणून ज्या शाळा शासनाने विलगिकरण कक्षासाठी ताब्यात घेतलेल्या आहेत त्या शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात येणार नाही.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा