Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
रेशन कार्ड बनवून देण्यासाठी दिलेल्या पैशांवरून दोन महिलांमध्ये वाद, परस्परविरोधी गुन्हा दाखल..!
रेशन कार्ड बनवून देण्यासाठी दिलेल्या पैशांवरून दोन महिलांमध्ये वाद, परस्परविरोधी गुन्हा दाखल..!
अमळनेर (प्रतिनिधी)रेशन कार्ड बनवून देण्यासाठी दिलेल्या पैशांवरून दोन महिलांमध्ये झालेल्या वादा प्रकरणी परस्परविरोधी दरोडा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली फिर्याद अमळनेर शहरातील पैलाड भागातील साई गजानननगर मधील सविता रवींद्र दाभाडे या महिलेने दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांनी रेशन कार्ड बनवण्यासाठी 2 वर्षांपूर्वी ज्योती भोई या महिलेला 3 हजार रुपये दिले होते. मात्र त्यांनी रेशन कार्ड बनले नाही म्हणून तिला वारंवार विचारणा केली असता तिने 5 हजार रुपयांची मागणी केली. एव्हडे पैसे देऊ शकत नाही म्हणून सविता 19 रोजी दुपारी 2 वाजता ज्योती भोई हिच्या घरी पैसे परत मागायला गेली असता ज्योती भोई हिने तिला जातीवाचक शिवीगाळ केली महिलेच्या फिर्यादीवरून ज्योती भोई विरुद्ध अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास डी वाय एस पी सौरभ अग्रवाल करीत आहेत.
दुसरी फिर्याद ज्योती धनराज भोई यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 19 रोजी दुपारी साडे तीन वाजता सविता रवींद्र दाभाडे (रा.अमळनेर) व मनीषा प्रल्हाद शेजवळ (रा. धुळे) यांच्यासोबत 6 महिला घरी आल्या व रेशन कार्डसाठी दिलेले पैसे परत दिले नाही तर तुला जीवंत सोडणार नाही म्हणत बळजबरीने घरात घुसून शिवीगाळ करून मारहाण केली व केस ताणले आणि गळ्यातील दोन तोळ्यांचा 60 हजार रुपयांचा सोन्याचा गोफ तसेच कानातले रिंग तोडून नेली आणि मोबाईल आपटून फोडून टाकला. यावरून सविता दाभाडे , मनीषा शेजवळ यांच्यासह अनोळखी 6 महिलांवर भादवी 395 , 323 , 504 , 506 , 427 प्रमाणे दरोडा व मालमत्तेचे नुकसान केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा