Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
मुख्यमंत्री निधीतुन मदत झालेली कु शितल अहिरे या तरुणीने...! विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधुन ॠण व्यक्त केले..!
मुख्यमंत्री निधीतुन मदत झालेली कु शितल अहिरे या तरुणीने...! विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधुन ॠण व्यक्त केले..!
शिरपूर:अनोखे रक्षाबंधन दि. 3 आॅगस्ट रोजी शिरपूरच्या दौर्यावर असताना रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरे करता आले. गरताड ता. शिरपूर. जि. धुळे या गावातील शीतल देविदास अहिरे या माझ्या बहिणीने राखी बांधली. तिला खूप खूप आशीर्वाद ! शीतलला श्रवणाची समस्या होती. 6 लाख रूपये शस्त्रक्रियेला लागणार होते. 2016 मध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतून 2 लाख आणि पंतप्रधान निधीतून 3 लाख रूपयांची मदत देण्यात आली.
मुंबईच्या नायर रूग्णालयात शस्त्रक्रिया झाली आणि त्यातून ती पूर्णपणे बरी झाली. माझ्या या बहिणीला खूप खूप शुभेच्छा अशी भावना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेली अनुसुचित जातीतील कु. शितल देविदास अहिरे रा. गरताड या तरुणीस पाच वर्षापुर्वी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन दोन लाख व पंतप्रधान निधीतुन तीन लाख रुपये धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांचा सततचा पाठपुराव्या मुळे मदत झाली होती.
दि. ३/८/२०२० रोजी शिरपुर दौर्यावर असलेले विधान सभा विरोधीपक्ष नेते ना देवेंद्र फडणवीस यांना माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांचा निवासस्थानी कु. शितल अहिरे या तरुणीने रक्षाबंधन असल्याने राखी बांधुन ॠण व्यक्त केले तर सरपंच पंकज बागुल यांनी आभार पत्र देवुन कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी माजी मंत्री आ. जयकुमार रावळ, माजी मंत्री अमरीशभाई पटेल, माजी केंद्रीय मंत्री खा. डाॅ. सुभाष भामरे, माजी मंत्री आ. डाॅ. विजयकुमार गावीत, खा. डाॅ. हिनाताई गावीत, आ. काशिराम पावरा, आ. राजेश पाडवी, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा