Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

मच्छिमाराचा वाद गेला प्रशासन दरबारी..! मच्छिमार सोसायटनी दिला उपोषणाचा इशारा...!



सोनगिर प्रतिनिधी:धुळे सोनवद येथील धरणात मत्स्यपालन व मासेमारीसाठी कायदेशीर प्रक्रिया द्वारे सोनगिरीच्या कालिंकादेवी सहकारी मच्छीमार सोसायटीला तलाव ठेका देण्यात आला आहे.


मात्र तेथे डोंगरगाव तालुका शिंदखेडा आणि धनुर तालुका धुळे येथील काही लोक मच्छीमारीसाठी येत असून ते सोनगीर येथील सोसायटीच्या सदस्यांना दमदाटी करून मच्छीमारी करीत आहेत त्यातून वाद होऊन प्रकरण सोनगीर व नरडाना पोलिसात ही गेले आहे मात्र संबंधितांवर काही एक कारवाई न झाल्याने हे प्रकरण संघर्षावर आले आहे. आम्हाला न्याय मिळावा अन्यथा आम्ही आमरण उपोषणात बसू असा इशारा कालिंका देवी सोसायटीच्या सदस्यांनी प्रशासनाला एका निवेदनाद्वारे दिला आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, धुळे यांच्याकडील २८ ऑगस्ट २०२०च्या आदेशाप्रमाणे सन २०२४ पर्यंत आमच्या सोसायटीला तलावठेका देण्यात आलेला आहे त्यानुसार आम्ही २७सप्टेंबर २०१९ रोजी तलावात लाखो रुपयांचे मत्स्यबीज सोडले आहे असे असताना ही काही लोक तेथे मासेमारी करताना दिसतात व त्यांना हटकले असता ते धनुर गावाचे असल्याचे समजते त्यावरून तेथे वाद झाला. 

याबाबतची फिर्याद सोनगीर पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. त्यां नतर  पुन्हा डोंगरगाव येथील काही लोक मासेमारी करताना दिसले तेव्हा सोनगीर पोलिसांनी आम्हाला नरडाणा पोलिस स्टेशनमध्ये पाठवले असता तेथे आम्ही फिर्याद दिली. तरीही काही कार्यवाही केली गेली नाही त्यामुळे पुन्हा मच्छिमारीचा तोच प्रकार घडत राहीला असुन त्यातून वाद उफाळला. काही लोकांनी लाठ्या-काठ्या घेऊन दगड उचलून भिरकविण्याचे व गुन्हे दाखल करण्याचे धमकावले आहे त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अन्यथा आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल तसेच आमच्या कुटुंबाच्या ठिकाणी आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे अन्यथा आमरण उपोषण करण्याशिवाय दुसरा पर्याय आमच्या समोर राहणार नाही असेही निवेदनात म्हटले आहे. 

निवेदनावर सोनगीर कालिकादेवी मच्छिमार सहकारी संस्था लिमिटेड सोनगीर तर्फे चेअरमन दिलीप भोई प्रवीण भाऊ प्रवीण सुरेश भोइ राजेंद्र भोई सुनील भोई चुनीलाल भोई महेंद्र भोई सुनील भोई बन्सीलाल भोई आदींनी सह्या केल्या आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध