Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०
अजब गावचा गजब कारभार...!
येवला(प्रतिनिधी) शहरातील कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन तारेवरची कसरत करत असताना प्रशासनामध्ये एक वाक्यता दिसून येत नसल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे येवले शहरातील नगरपालिका कर्मचारी सर्व भाजीपाला व फळे विक्रेत्यांना व इतर किरकोळ घाऊक विक्रेत्यांना उद्या दुकाना लावायच्या नाही उद्या बंद आहे असे सांगता आहे तर दुसरीकडे भाजीपाल्याचे लिलाव नेहमी प्रमाणे होणार असून त्याबाबत कोणत्याही वेगळ्या अथवा नवीन सूचना बाजार समितीकडून आले
नसल्याचे भाजीपाला आडत्यांनी सांगितले त्यामुळे भाजीपाला विक्रेते आणि जनतेमध्ये मोठा संभ्रम असून शेतकऱ्यांची मात्र यात मोठी अडचण होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे कारण बाजार समितीने कोणतीही सूचना काढलेली नसताना जर येवले शहरातील भाजीपाला दुकान लागली नाही तर शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला कुठे विकायचा हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
शहरातील भाजीपाला विक्रेता संघाच्या वतीने दररोजच्या भाजीपाला दुकाने नगरपालिका प्रशासनाने नेमून दिलेली आहेत त्या ठिकाणी मंगळवारी देखील लावून देण्यास परवानगी द्यावी असे प्रशासनास विनंती केली आहे परंतु प्रशासन नेमकी करत काय आहे असा सवाल शहरातील सुज्ञ नागरिक व शेतकरी वर्गातून केला जात आहे या सगळ्या गोंधळामुळे अजब गावचा गजब कारभार ही म्हण येवले शहराला सध्या लागू होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा