Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
नाक्यावर कणसे, भाजीपाला व फळे विकुन भोई भगिनिने समाजघटकासमोर केला एक आदर्श...! श्री अर्जुनभोई मुंबई
नाक्यावर कणसे, भाजीपाला व फळे विकुन भोई भगिनिने समाजघटकासमोर केला एक आदर्श...! श्री अर्जुनभोई मुंबई
मुंबई/कणकवली: दहावीची परीक्षा दिल्यानंतर कणकवलीतील नरडवे नाका, श्रीधर नाईकचौक परिसरात कोमल ज्ञानेश्वर इंगळे ही हातगाडीवर फळे व कणसे विक्रीचा व्यवसाय करत आहे. दहावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला तेव्हाही ती नरडवे नाका येथे सकाळपासून कणसे विकत होती. कणकवली विद्यामंदिरची विद्यार्थिनी असलेल्या कोमल इंगळे हिला दहावीमध्ये ७३:८०% मार्क मिळाले आहेत आणि यातुनच आपल्याला पोलीस अधिकारी व्हायचे असल्याचे तिने सांगितले.
हातगाडीवर कधी फळे, कधी भाजीपाला, तर कधी मक्याची कणसे घेऊन कणकवलीतील श्रीधर नाईकचौक परिसरात बसलेली भगिनी भोई समाजातीलच नाही तर इतर समाजातील मुलामुलींना मोलाचा संदेश देत आहे तो म्हणजे तुम्ही ही धंद्यात आपल्याला उतरवा, धंद्यातील प्रशिक्षण आपल्या पालकांकडून घ्या आणि जीवनात आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करा असाच काहीसा तो संदेश आहे.
सदर भगिनीचा गेले काही महिने या व्यावसायामध्ये वावर सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील तळेगांव पातुर्डा, तालुका तेल्हारा येथील संजय रामदास इंगळे यांचे मोठे भाऊ ज्ञानेश्वर इंगळे हे आपले कुटुंबीय गेली सात-आठ वर्षापासुन आपल्या कुटुंबाला घेऊन कणकवलीत फळे, भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. कणकवलीतील शाळा क्रमांक पाच जवळील संतोष हरणे यांच्या घरात भाड्याने ते कुटुंबासह राहतात याच कुटुंबातील कोमल इंगळे हिचे चौथीपर्यंतचे शिक्षण तळेगाव-पातुर्डा येथे झाले त्यानंतर पाचवीपासून ती विद्यामंदिर हायस्कूल मध्ये शिकत आहे. शालेय अभ्यासक्रमाबरोबर एनसीसीमध्ये तिने विशेष प्राविण्य मिळवले आहे. एनसीसी मधून झालेल्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये ही तिने सातत्याने यश मिळविले आहे.
दहावीची परीक्षा झाल्यानंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वडिलांसोबत नरडवे नाका परिसरात हातगाडीवर फळे व कणसे विकण्याचे आजही ती काम करते आहे. कणसे विकत वडिलांना आर्थिक हातभार लावताना तिच्या चेह-यावर आनंदच झळकत आहे तसेच पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्नही तिने उराशी बाळगले आहे. काही दिवसापूर्वी वडील तळेगाव-पातुर्डा येथे गावी गेले असता कोमल ही एकटीच कणसे विकण्याचा व्यवसाय स्वत: सांभाळत आहे.
यातुन तिचा धीटपणा समोर दिसत आहे. दहावीतील यशानंतर तिचा व तिच्या कुटुंबियांचा आनंद हा द्विगुणितच झाला आहे. कोणतेही क्लासचे शिक्षण न घेता केवळ विद्यालयातील मार्गदर्शनाच्या नावावरच तिने हे यश संपादन केले आहे.
अशा होतकरु समाजभगिनीला समाजपटलावरुन वेळेवर मदत होणे ही महत्त्वाचे आहे. सदर भगिनीचा आम्हाला सार्थ अभिमानच आहे असे परिसरातुन भावना पुढे येत आहेत आणि भगिनीस पुढील शिक्षणासाठी व तिच्या ईच्छाशक्तीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा सतत मिळत असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना तिने सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा