Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

बीएमएस (ई-कॉमर्स) मध्ये विद्यापीठ गुणवत्ता..! यादीत उत्तर महाराष्ट्रातील आमचाही भोईराज..!



           (हर्षल संतोष भोई शिरपुर) 

प्रतिनिधी:आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे बी.एम.एस. (ई,कॉमर्स) चे विद्यार्थी विद्यापीठ गुणवत्ता यादीत आले आहेत. शिरपूर येथील आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बी.एम.एस. (ई-कॉमर्स) या अभ्यासक्रमाचा नुकताच निकाल जाहीर झाला असून सदरच्या अभ्यासक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठस्तरीय परीक्षेत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.

बी.एम.एस (ई.कॉमर्स) अभ्यासक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तरमहाराष्ट्र विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत पहिला येण्याचा मान आमच्या भोईराजला मिळाला आहे. 

बी.एम.एस द्वितीय वर्षातील एकूण ६ विद्यार्थ्यांनी पहिल्या दहा क्रमांकात येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. 

यात (भोई हर्षल संतोष )यांनी सीजीपीए ९.५७ ग्रेड मिळवत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत द्वितीय स्थानी व महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने आलेले आहेत. पाटील शिवाजी निंबा याने सीजीपीए ९.२९ ग्रेड मिळवत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. 

पंजाबी आदित्य दीपक सीजीपीए ९.१४ ग्रेड घेत विद्यापीठात पाचव्या स्थानी येण्याचा मान मिळविला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थापक अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, संस्थेचे अध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ जयश्रीबेन पटेल,उपाध्यक्ष तपनभाई पटेल, चेअरमन राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण,माजी कुलगुरु डॉ के.बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी. आर.पाटील, उपप्राचार्य डॉ अनिल सोनवणे, विभाग प्रमुख डॉ अरुण पाटील यांनी केले आहे. 

विद्यार्थ्यांना प्रा अनिता मोरे, प्रा गोपाल बिडे, प्रा डॉ रुपाली अग्रवाल, प्रा रामकुमार सूर्यवंशी, प्रा जयश्री दोरिक, प्रा अशोक तीर्थाप, प्रा सपना येशी, गणेश सोनार, संजय मोरे, बी. टी.चौधरी, डी.यु.पटेल, संदेश राजपूत, मेहुल गुजराथी, हंसराज कढरे, लक्ष्मीकांत मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध