Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

कोरोनाच्या काळातही ग्रामीण भागात अवैध दारू विक्री जोमात कार्यवाही करण्याची जनतेची मागणी....!



सत्रासेन प्रतिनिधी:सुभाष पाटील
चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावात कोरोनाच्या काळातही अवैध दारु विक्री जोमात सुरु आहे.ग्रामीण भागात कोरोना पाय पसरत असताना दारु विक्रीला जोर आल्याने नागरिकामधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने राज्यात गेल्या पाच महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात येत आहे.त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना चहा देखील लपून प्यावे लागत होते.मात्र ग्रामीण भागात अवैध दारु विक्री खुलेआम सुरु आहे.चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांन मध्ये  अवैध दारु विक्री जोमात सुरु असून या दारु विक्रेत्या विरोधात कार्यवाही होत नसल्याने दारु विक्रेत्यांना कोणाचे आशिर्वाद मिळत आहे असा सवाल नागरिकामधून विचारला जात आहे.एकीकडे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासह ग्रामीण भागातील
सरपंच,उपसरपंच,पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.तसेच सर्वत्र सोशल डिस्टन्सचे पालन करण्याची खबरदारी घेण्यात येत आहे.परंतु दुसरीकडे ग्रामीण भागात अवैध दारु विक्रीला जोर आला असून दारुच्या अड्डयावर अनेक तळीराम मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात.लॉकडाऊनमध्ये सर्व दुकाने बंद असताना नागरिकांना चहा देखील लपून प्यावे लागत होते.परंतु अवैध दारुचे अड्डे मात्र खुलेआम सुरु आहेत.

या अवैध दारु विक्रेत्यांना कोणाचे आशिर्वाद मिळत आहे असा सवाल नागरिक मधून विचारला जात आहे.कारण कित्येक दिवसापासून सुरु असलेल्या अवैध दारु विक्री विरोधात पोलिसांकडून कार्यवाही होत नसल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

"ग्रामीण भागातील अवैध दारु विक्रीच्या विरोधात कार्यवाही होत नसल्याने दारु विक्रेत्यांची संख्या वाढली आहे.

लॉकडाऊनमुळे काही व्यवसाय बंद पडल्याने काही जण दारुचा व्यवसाय करतात.तसेच शाळा व महाविद्यालय बंद असल्याने महाविद्यालयीन युवकांना दारुचे व्यसन लागण्याची शक्यता आहे."



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध