Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

बाजारपेठेची वेळ वाढवण्याची जिल्हाधिकारी यांच्या कडे भाजप युवा मोर्चाची मागणी...!



कोरोना महामारीच्या संकटाने खचलेल्या तसेच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असलेल्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी बाजारपेठेची वेळ वाढवण्याची मागणी भाजप युवा मोर्चा वतीने शहराध्यक्ष श्रमिक पोतदार यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या कडे निवेदनाद्वारे केली.
     
निवेदनात म्हटले आहे की सध्या देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे पण केंद्र व राज्य शासन अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उदयोग व रोजचे व्यवहार सुरळीत करण्यासाठी अनलॉक ची प्रक्रीया सुरु केली करून बाजारपेठ उघडण्यासाठी मुभा देत बाजारपेठेची वेळ सायं 7 वाजेपर्यंत वाढवली आहे. कोरोनामुळे लॉकडाउन सुरू झाल्यानंतर सर्व व्यवहार ठप्प झाले होते त्यामुळे सर्वांनाच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला त्यामुळे व्यापारी खचुन गेला आहे अनलॉक मुळे दिलासा मिळाला होता पण आपल्या कार्यालयाच्या आदेशाने सध्या बाजारपेठेची वेळ पुन्हा कमी करण्यात आली आहे. 
           
नळदुर्ग शहर हे जवळपास 20 ते 30 हजार लोकसंख्येच गाव असून येथे 30 ते 40 खेडेगावाला मध्यवर्ती ठिकाण आहे. यासर्व गावातील लोक खरेदीसाठी नळदुर्ग शहरात येत असतात. आपल्या कार्यालयाच्या आदेशानुसार बाजारपेठा दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू आहेत त्यामुळे शहरातील तसेच खेडयागावातील ग्राहक व व्यवसायिकांना खरेदी विक्रीसाठी वेळ कमी पडत आहे तसेच 3 वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू असल्याने ग्राहक एकाच वेळी गर्दी करत असल्याने सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे शक्य होत नाही त्यामुळे बाजारपेठेची वेळ वाढवावी अशी व्यापारी तसेच ग्राहकांची भावना आहे त्यामुळे व्यापार्यानी शासनाच्या सर्व नियमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देउन बाजारपेठेची वेळ किमान 5 वाजेपर्यंत करावी जेणेकरून आर्थिक अडचीणीचा सामना करावा लागत असलेल्या व्यापार्यांना दिलासा मिळेल अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या कडे करण्यात आली यावर श्री दिवेगावकर यांनी बाजारपेठेची वेळ वाढविण्याबाबत आपण लवकरच निर्णय घेऊ असे सांगितले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध