Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ९ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात माझाही भोईराज समाजघटक होता...! श्री अर्जुनभोई मुंबई..!
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात माझाही भोईराज समाजघटक होता...! श्री अर्जुनभोई मुंबई..!
बदलापूर/मुंबई प्रतिनिधी:गांधीजींनी इंग्रजांना भारतातून चलेजावचा जो नारा दिला त्यातुन इंग्रजांनी गांधीजींना अटक केली त्यावेळी गांधीजींच्या अटकेची वार्ता ही वा-यासारखी मुंबई परिसरात पसरली होती. क्रांतिकारी विचारांची मंडळी ही तर देशाभिमानाने फारच खवळली होती त्यात त्यांनी स्थानिकपातळीवर अनेक गट, संघटन निर्माण केले, ठिकठिकाणी काही टोळ्याही तयार केल्या.
ठाणे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी टोळ्या निर्माण झाल्या होत्या त्यापैकी विठ्ठल कोतवाल साहेबांची एक टोळी निर्माण झाली होती या टोळीमध्ये एरंजड-भोईसावरे, बदलापूर येथील भोई समाजाचे स्वातंत्र्यवीर सैनिक राघो शंकर गाडे हेही जुळले होते. टोळीत जुळते वेळी त्यांचे वय चाळीस वर्षांचे असेल जन्मगाव एरंजड- बदलापूर परंतु मामाच्या गावाला भोईसावरे याठिकाणी राहण्यासाठी ते गेले होते.
तेथे त्यांना रत्नागिरीचे धोंडू देसाई भेटले. तेथे दोघांचीही ओळख झाली. दोघांनी आपण आपल्या देशासाठी काही तरी करावं या विचारात बसले असता त्यावर स्वातंत्र्यसैनिक राघो शंकर गाडे म्हणाले, देसाईजी कसला विचार करता? आपण त्यावरही काहीतरी मार्ग काढू. विचारांती दोघांनीही भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची सुरुवात असहकाराच्या कृतीने सुरु केली. संपूर्ण देशाचे क्रांतिकारी मंडळी ही चलेजावच्या ना-याने पेटुन उठली होती.
त्यात दोघांनी सहभागी होण्याचे ठरलेच होते दोघांनी विभागात काही मंडळी जमवली त्यात वामन काळू भोईर, देवाभाऊ कनोजे, नथ्थू बाबु भोईर, रत्नागिरीचे धोंडू देसाई अशा काही जणांची एक टोळी निर्माण झाली. दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या कामाला त्यानी सुरुवातही केली. कार्य होते प्रथम कल्याण तालुक्याची टेलिफोन यंत्रणा ही बंद पाडायची. त्यातच त्यांनी मुख्य केंद्र कापले, ठिकठिकाणी टेलिफोन लाईन कापली त्यामुळे इंग्रजांना आपल्या यंत्रणेशी संपर्क करतांना अडचणी येत होत्या. त्यांना एकमेकांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. काही महिने त्यांचे हे अविरत काम चालत राहिले. काही महिन्यानंतर इंग्रजांना माहिती मिळाली आणि त्यांनी सदर मंडळीवर पकड वॉरंट काढले. अब्दुल नामक बदलापूर गावात राहणाऱ्या एका इसमाने त्यांना माहिती व सल्लाही दिला तुमच्यावर वारंट निघाले आहे आपण या विभागातून कुठेतरी निघून जावे. यावर त्या सर्वांनी विचार केला व तेथून त्यांनी जंगलाची वाट धरली. मुरबाड बदलापूरच्या पट्ट्यातील जंगलात वीरभाई कोतवाल साहेबांच्या टोळीत सहभागी होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला.
धोंडू देसाई यांनी फोंड्याचीवाडी या ठिकाणी कोतवाल साहेबांची टोळी होती तिचा शोध घेतला आणि तिकडे ते वळले त्या टोळीत हुतात्मा वीरभाई कोतवालसाहेब, हिराजी पाटील, गोमाजी पाटील,झिपरु पाटील, दुर्ग्या कोळी यांचा सहभाग होता. त्यांच्या बरोबर ते सामील झाले. दुसर्या दिवशी दौलतपाडा या ठिकाणांची टेलीफोन यंत्रणा कापली इंग्रजांचा संपर्क तोडला त्यानंतर असेच त्यांचे कार्य असेच सुरू झाले पोटरपाली फोंड्याचीवाडी, पाटगाव, बोरगाव, नेरळ, बदलापुर, वांगणी, अंबरनाथ असे त्यांचे सातत्याने कार्य पुढेपुढे चालू होते. परिसरातल्या अनेक हालचालींवर त्यांचे बारीक लक्ष होते आणि त्या हालचालीचे बारकाईने ते निरीक्षणही करत होते.
काही दिवसातच इंग्रजांनी टोळीच्या मागावर राहुन सिद्धगडावर (मुरबाड परिसरात) हल्ला केला त्यात वीरभाई कोतवालसाहेब हुतात्मा म्हणून कामी आले. टोळीतील इतरांना बंदीवान केले गेले आणि त्यातील राघो शंकर गाडे-भोई यांना पाच वर्षाचा कारावास झाला आणि त्यांना बंदीवासात टाकले गेले. बंदीवासात अनंत हाल अपेष्टा त्यांना सहन कराव्या लागल्या पण देशसेवा ही आमच्याकडून झाली हाच सार्थ अभिमान त्यांच्या चेह-यावर सदैव झळकत होता. १५ आॅगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला आणि ६ जानेवारी १९४८ रोजी स्वातंत्र्यसेनानी म्हणून राघो शंकर गाडे हा भोयांचा वाघ बंदीवासातुन बाहेर आला.
पुढील सामाजिक जीवनात अनंत प्रसंगांना त्यांना तोंड द्यावे लागले परंतु मातृभूमीसाठी आपले काही तरी योगदान दिले गेले हे फार मोठे समाधान त्यांच्या चेह-यावर ओसंडून वाहत असे. १९जून २०१४ रोजी ते अनंतात विलिन झाले त्यांचा परिवार आजही एरंजाड,भोई सावरे,बदलापूर विभागात आहे. कोंकण किनारपट्टीवरील क्रांतीकारी विचाराचे भोई समाजाचे जेष्ठसमाजसेवक आणि बदलापूर शहराचे प्रथम नगराध्यक्ष कै अनंतजीसेठ सपकाळ साहेब यांच्या बरोबर स्वातंत्र्यसेनानी राघो शंकर गाडे यांच्या अंतिम दर्शनाच्या संस्काराच्या कार्यात सहभागी होता आले होते
आणि तिच आत्मिक समाधानाची बाब आम्हासाठी आम्हीही समजतो कारण भारतीय स्वातंत्र्यलढ्यात माझाही भोईराज सहभागी झाला होता.
जय हिंद।।
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा