Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

कोरोना योध्दांचा गौरवपत्र देऊन सन्मान..!

  
                                           
कोरोना योध्दांच्या सेवानिष्ठेनेच देश मजबूत
सौ.कल्पनाताई मसने                                                                                (शेगांव शहर प्रतिनिधी उमेश राजगुरे मोबाईल नंबर  98 81 79 46 32 ) - कोरोना योध्दांनी महामारीच्या काळात मोठय़ा हिम्मंतीने व प्रमाणीकपणे सेवानिष्ठा केल्यामुळेच देश या बिकट परिस्थितीचा सामना करण्यात यशस्वी होत आहे. 

असे मत भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हासरचीटणीस सौ.कल्पनाताई मसने यांनी रक्षाबंधनदिनी कोरोना योध्दांचा राखी बांधून तसेच गौरवपत्र देऊन सन्मानित करतांना व्यक्त केले. 
                                               कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात भारत देश मुकाबला करण्यात यशस्वी ठरत आहे .यामध्ये  कोरोना योध्दांची भुमिका महत्वपूर्ण आहे हे ओळखून महाराष्ट्र राज्य भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा ऊमाताई खापरे यांच्या सूचनेनुसार,अर्पणाताई कुटे यांच्या मार्गदर्शनात, शेगांव नगराध्यक्षा शकुंतलाताई बुच व भाजपा महिला आघाडी अध्यक्षा डॉ.अंजुशाताई भुतडा यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हासरचीटणीस कल्पनाताई मसने यांचे नेतृत्वात शेगांव शहरातील न.प.सफाई कामगार, सामान्य उपजिल्हा रुग्णालयातील डाॅक्टर ,परिचारिका, कर्मचारीवृंद ,अॅम्बुंलस चालक.पोलीस अधिकारी व कर्मचारीवृंद,भाजी विक्रेते, बँक कर्मचारीवृंद, मेडिकल व्यवसायीक,पत्रकार  यांचा कोरोना काळात देत असलेल्या अतुलनीय सेवाकार्याबद्दल रक्षाबंधनदिनी राखी बांधून मिठाई दिली तसेच सोबत सॅनिटायझरची बाटली व प्रदेश भाजपा महिला मोर्चाच्या वतीने पाठविण्यात आलेले गौरवपत्र देउन सर्वांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जिल्हासरचीटणीस सौ.कल्पनाताई मसने, शेगांव नगराध्यक्षा सौ.शकुंतलाताई बुच, बांधकाम सभापती सौ.मालाबाई ठवे , महिला शहराध्यक्षा डाॅ.अंजुशा भुतडा,नगरसेविका  सौ.अलकाताई खानझोडे,सौ.ज्योतीताई चांडक व सौ.सुवर्णाताई लहाने यांची उपस्थिती होती. या उत्कृष्ट उपक्रमाचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे.  

हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी शरदसेठ अग्रवाल, पुरुषोत्तमभाऊ शेगोकार, पांडुरंगभाऊ बुच, प्रदिपदादा सांगळे आदींनी मोलाचे सहकार्य केले अशी माहिती सौ.कल्पनाताई मसने यांनी दिली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध