Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ९ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
अवैध मुरूम गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर..! तहसीलदार आबा महाजन यांची धडक कारवाई...!
अवैध मुरूम गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर..! तहसीलदार आबा महाजन यांची धडक कारवाई...!
शिरपूर (प्रतिनिधी) शहरातील करवंदनाक्यावर अवैधपणे मुरुम वाहतूक करणारे डंपरवर तहसीलदार आबा महाजन यांनी कार्यवाही करीत ६ ब्रास मुरुमसह डंपर पताब्यात घेऊन प्रांताधिकारी कार्यालयात जमा केले आहे.
सविस्तर असे की दि.४ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास तहसीलदार आबा महाजन हे शासकीय वाहनाने शहरातील करवंद नाक्यावरून जात असतांना एम.एच. १८ बी.ए. १५७७ क्रमांकाच्या डंपरमध्ये मुरूम या गौण खनिज ची वाहतूक करताना आढळून आले.सदर वाहन थांबवून चौकशी केली असता मुरूम ची अवैध रित्या वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी त्वरित कारवाई पथकास बोलावून चौकशीचे आदेश दिले.पथकाने चौकशी करीत वाहनाचा पंचनामा केला असता वाहनात ६ ब्रास मुरूम ची अवैध वाहतूक केल्याचे निदर्शनास आले.सदर वाहन मुरूमसह ताब्यात घेत प्रांताधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. सदर वाहन हे श्रीकांत चौधरी यांचे असल्याचे वाहन चालक युसूफ शब्बीर पटेल यांनी सांगितले.
वरील कार्यवाही ही मंडळ अधिकारी पी.पी. ढोले, अशोक गुजर, संजय जगताप, तलाठी राजपूत,सतीश पाटोळे यांच्या पथकाने केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा