Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपुरात गणेश मंडळाच्या...! अध्यक्ष,उपाध्यक्ष यांच्यावर गुन्हा, कोरोना काळात नियमांचे उल्लंघन...!
शिरपुरात गणेश मंडळाच्या...! अध्यक्ष,उपाध्यक्ष यांच्यावर गुन्हा, कोरोना काळात नियमांचे उल्लंघन...!
शिरपूर (प्रतिनिधी)तालुक्यात कोणाचा प्रभाव रोखण्यासाठी यावर्षी सर्वच धार्मिक पण साध्या स्वरुपात साजरा करण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात शहरातील दोन सार्वजनिक गणेश मंडळांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत एक मीटिंग घेऊन या पूर्वीच पोलीस अधीक्षक यांनी सूचना दिल्या होत्या.
सध्या कोरोनाच्या सावटाखाली शहरात प्रशासनच्या आदेशानुसार दि. २२ ऑगस्ट रोजी श्रीगणेशाची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली आहे. दि.२२ ऑगस्ट रोजी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रामकृष्ण एन.मोरे,पोकॉ हेमंत एस.पाटील व पोकॉ महेंद्र सपकाळ हे शहरात सायंकाळी पेट्रोलिंग करीत असतांना शहरातील आदर्श नगर येथील न्यु भोईराज सार्वजनिक गणेश मंडळातर्फे शामा मुखर्जी रोडवरील नगरपालिकेच्या मालकी हक्काच्या जागेत तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ अंबिका नगर सार्वजनिक गणेश मित्र मंडळ या दोन सार्वजनिक गणेश मंडळांकडून कोणतीही शासकीय परवानगी न घेता वाहतुकीस अडथळा होईल असा मोठा स्वरूपाचा मंडप उभारून ४ फुटांपेक्षा जास्त उंचीची श्री गणेश मूर्तीची स्थापना केली असल्याचे तसेच या दोन्ही ठिकाणी कोविड १९ च्या सर्वच नियमांचे उल्लंघन करतांना आढळून आले.
याप्रकरणी पोकॉ महेंद्र सपकाळ यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून न्यु भोईराज सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष तुषार राजेंद्र शिवदे व उपाध्यक्ष हरीश अनिल भोई रा.भोईगल्ली व अंबिका नगर सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष पंकज रामकृष्ण सोनवणे,उपाध्यक्ष पावन बबन मराठे रा.अंबिका नगर शिरपूर यांच्या विरुद्ध व्यक्ती संस्था अथवा आपत्ती व्यवस्था कायदा सन २००५, साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा सन १८८७ व भादवी कलम १८८ अन्वये व मोटार वाहन कायदा कलम १२२/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय संदीप मुरकुटे करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा